भुसावळ – अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ जळगाव जिल्हा भुसावळ तालुक्याची बैठक आज रविवार दिनांक 28 जुलै रोजी भुसावळ येथील शामा मुखर्जी उद्यानात स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रावेर विभागाच्या भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, यावल अध्यक्षपदी वरणगाव येथील संतोष माळी यांच्या निवडीची घोषणा राज्य उपाध्यक्ष भागवत पाटील यांनी केली.

अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डी.एन.पाटील, सचिव सुरेंद्र यादव, राज्य उपाध्यक्ष राजेश अंबुस्कर यांच्या आदेशाने जेष्ठ नेते भागवत पाटील यांनी ही घोषणा केली. भुसावळ येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भागवत पाटील होते. जिल्हाध्यक्ष तुकाराम निकम, जिल्हा सचिव सुनील अंभोरे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख कैलास उपाध्याय, भुसावळ तालुकाध्यक्ष महेंद्र सपकाळे, उपाध्यक्ष सी. आर. पाटील, शहराध्यक्ष आरिफ मिर्झा व्यासपीठावर उपस्थिती होती.
प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष महेंद्र सपकाळे यांनी सध्या स्वस्त धान्य दुकानात सर्व्हर डाऊन असल्यामुळे ई-पोस मशीन चालत नसल्यामुळे लाभार्थ्यांना धान्य वाटप करायला खूप अडचणी निर्माण होत आहे. या यासंदर्भात तहसीलदार नीता लबडे मॅडम, जिल्हा पुरवठा अधिकारी यांना याबाबत निवेदन देऊन ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याची विनंती निवेदन देऊन केली असल्याचे या बैठकीत सांगितले. जिल्हा सचिव सुनील अंभोरे, कैलास उपाध्याय यांनीही ई पॉस मशीनमुळे विविध अडचणी निर्माण झाल्याचे सांगितले.
या बैठकीला तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यशवंत बनसोडे, रहमान गवळी, ईश्वर पवार, पंकज पाटील, सुभाष पाटील विजय मेढे, अनिता आंबेकर टीना धांडे, लकी सुरवाडे, छाया बोंडे शांताराम इंगळे, उल्हास भारसके, सुभाष चौधरी, भगवान वंजारी, अशोक प्रधान, संजय राजपूत, राजेश सैनी, नितीन जैन, रुपेश भोळे, भास्कर चौधरी, उमाकांत शर्मा, पराग वाणी, धीरज बराटे, प्रतीक आंबेकर, मनोज घोडेस्वर, संतोष साळवे, शिवाजी पाटील, देविदास जोहरे, भगवान नन्नवरे आदी स्वस्त धान्य दुकानदार यांची उपस्थिती होती. आभार सी. आर. पाटील यांनी मानले.



