भारतीय बौद्ध महासभेची भुसावळ महीला शहर कार्यकारणी जाहीर :

भुसावळ:- आज रोजी शिलरत्न बुद्ध विहार , चांदमारी चाळ, भुसावळ येथे भारतीय बौद्ध महासभेची बैठक संपन्न झाली. त्या बैठकीत भुसावळ शहर शाखा, महीला कार्यकारणी गठीत करण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्षा प्रियंका अहिरे या होत्या तर बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार यांनी केले होते.
बैठकीला जिल्हा संघटक वनमाला हिवाळे, कोषाध्यक्ष शैलेन्द्र जाधव, जिल्हा सचिव समता सैनिक दलच्या पल्लवी गुरचळ, केंद्रीय शिक्षका सिमा अहिरे, तालुका हिशोबतपासणीस प्रवीण डांगे, इत्यादी प्रमुख उपस्थिती होती.
भुसावळ शहर कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहिर करण्यात आली शहर अध्यक्ष प्रतिभा प्रकाश सोनवणे, सरचिटणीस सुरेखा राजेंद्र गायकवाड, उपाध्यक्ष (संस्कार) अनिता दिलीप तोरणे, उपाध्यक्षा समता सैनिक दल कमल रघुनाथ निकम,कोषाध्यक्ष वर्षा गणेश जाधव, कार्यालयीन साचिव लता संजय इंगळे, हिशोबतपसानिस कविता सुरेश तायडे, सचिव अंजली अशोक पोळ , सचिव समता सैनिक दल सारिका गौतम सिरसाठ, सदस्य सुजाता संजय जंजाळ, रमाबाई जाधव, लता केदारे, वैजयंती शिरसोरे, लक्ष्मी गायकवाड, शकुंतला तायडे इत्यादी .
बैठकीला शेवटी आभार प्रदर्शन सिमा अहिरे यांनी केले.