भुसावळ – भुसावळ तालुक्यात वरणगाव येथील आंबेडकरनगर मध्ये एका जवळ गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती पेट्रोलिंग करताना वरणगाव येथील पो.ना.श्रीकृष्ण देशमुख यांना मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एकाच ताब्यात घेतले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.श्री महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथील पथकास जळगाव जिल्ह्यात अनेक इसम हे दहशत माजविण्याचे उद्देशाने अवैध अग्नी शस्त्र वापरत आहेत.सदर बाबत गोपनीय माहिती काढून अश्यां लोकांवर पुढील योग्य ती कारवाई करा असे आदेश दिले.
त्यावरुन पो.ना.श्रीकृष्ण देशमुख हे वरणगाव शहरात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहितीच्या
आधारे बातमी मिळाली की,वरणगाव शहरातील आंबेडकर नगर येथिल हरिष उजलेकर यांचे जवळ गावठी
कट्टा बाळगत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.त्यावर जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पो.हे.प्रितम पाटील,श्रीकृष्ण देशमुख,उदय कापडणे, रविंद्र चौधरी सर्व नेमणुक स्थागुशा जळगाव अशांचे पथक तयार करून तात्काळ वरणगाव येथून हरिष उजलेकर, याची माहिती घेवुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.त्यावरून हरिष उजलेकर, आंबेडकर नगर वरणगाव शहरात मिळून आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव हरिष उर्फ हर्ष
राहुल उजलेकर,वय १९, रा.आंबेडकर नगर,वरणगाव असे सांगीतले त्यावरून त्याचे अंगझडती घेता त्याचे ताब्यात ४०,०००/- रु. कि. चे २ गावठी बनावटीची पिस्टल व २ जिवंत काडतुस मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचे विरुध्द वरणगाव पो.स्टे. CCTNS NO १३६ / २०२४ शस्त्र अधिनियम ३ /२५ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याची वैद्यकिय तपासणी करून त्यास सदर गुन्ह्याचे पुढील तपासकामी वरणगाव पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर गुन्ह्याची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.श्री महेश्वर रेड्डी,अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, मुक्ताईनगर पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे, यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याची माहिती जळगाव पोलीस
जनसंपर्क अधिकारी अधिकारी यांनी दिली.



