चोरट्यांचा पाठलाग करताना शासकीय वाहन पलटी दोन पोलीस कर्मचारी जखमी

भडगाव –
भडगाव तालुक्यातील रात्री दीड वाजेच्या सुमारास भडगावहून स्विफ्ट गाडी घेऊन चोरट्यांचा पाठीमागे लागले असता भडगाव पोलीस स्टेशन येथील कर्मचारी शासकीय वाहन घेऊन पाठलाग करत असताना चाळीसगाव येथे पोलिसांची शासकीय वाहनाला चोरट्यांची गाडीने पोलिसांचा वाहनाला धडक देऊन समोर असलेल्या खंब्याला जोरात धडक दिली यात पोलीस गाडीचा मोठे प्रमाणात नुकसान होऊन भडगाव पोलीस स्टेशनचे रात्रीच्या वेळी गस्त घालणारे संदीप सोनवणे , मनोहर पाटील, दोन कर्मचारी जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असल्याचे माहिती समोर आली आहे या चोर पोलिसांच्या खेड्यात तीन चोरट्यांना मात्र पोलिसांनी मोठ्या कसरतीने जेरबंद केले आहे , भडगाव पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी जीवाची परवा न करता मोठ्या धाडसीने चाळीस किलोमीटर पाठलाग करुन चोरट्यांना अटक केल्याने पोलीस कर्मचारी चे भडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने व परिसरात कौतुक होत आहे