५० हजारांची लाच भोवली ; भडगाव पोलीस ठाण्यातील पोलिस हवालदार किरण पाटील जळगाव एसीबीच्या जाळ्यात

भडगांव –

भडगाव येतील वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या भडगाव पोलीस ठाण्यातील पोलिस हवालदार किरण पाटील याला जळगाव एसीबीने अटक केली आहे. शुक्रवारी सकाळी१० वाजता झालेल्या कारवाईने जळगाव जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की
यातील तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर यापुर्वी भडगांव पोस्टेला अवैध वाळू वाहतूकी संदर्भात दोन गुन्हे दाखल आहे . तक्रारदार यानां सुरळीत वाळू वाहतूक करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी आरोपी लोक सेवक यांनी तक्रारदार यांचेकडे 2,60,000 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी तक्रार दिली होती. सदर तक्रारीची दिनांक 25/07/2024 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोक सेवक यांनी तक्रारदार यांचेकडे 2,60,000 रु मागणी करून त्यातील पहिला हप्ता म्हणून तडजोडीअंती पंचासमक्ष 50,000/- रुपये लाच रक्कम घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. आरोपी लोक सेवक यांचेवर भडगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
आरोपी लोक सेवक हवालदार किरण पाटील यांना काही दिवसा पूर्वीच पोलिस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी यांनी प्रशंसापत्र देऊन सन्मानित केले होते
जळगाव लाजलुचपत प्रतिबंधकचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव,पोउपनि/ दिनेशसिंग पाटील,पोकॉ /राकेश दुसाने, पोकॉ/अमोल सुर्यवंशी जळगांव युनिट यांनी हा सापळा यशस्वी केला