भुसावळ शहरातील सीसीटीव्ही साठी 4 कोटी निधीची मान्यता : आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नांना यश :


भुसावळ – शहरातील संवेदनशीलता लक्षात घेता संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे कामी भुसावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार संजय सावकारे यांनी निधी मान्यतेसाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत तब्बल चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला त्यासंदर्भातील पत्र नुकतेच प्रशासनाकडे प्राप्त झालेले आहे
आमदार संजय सावकारे यांनी शहरातील संवेदनशील तथा अति संवेदनशील प्रभाग वार्ड, एरिया तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची नागरिकांची मागणी पूर्ण केल्यामुळे संपूर्ण भुसावळ शहरात व परिसरात आनंदाचे वातावरण आहे
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत भुसावळ शहरातील वाहतूक व्यवस्थापन, कायदा सुव्यवस्था, तथा अति संवेदनशील भागात रस्ते व मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे कामी तब्बल चार कोटी रुपये निधीचे तब्बल 442 सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे कामे
प्रशासकीय मान्यता आदेश प्राप्त झाल्याची माहिती भुसावळ तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार संजय सावकारे यांनी दिलेली आहे
संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीला तसेच बेकायदेशीर वृत्तीला आळा बसेल इतके मात्र निश्चित आहे
भुसावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार संजय सावकारे यांच्या सतत पाठपुरावाने इतका मोठा निधी भुसावळशहर करता उपलब्ध झाल्यामुळे संपूर्ण शहरात आनंदाचे व उत्सवाचे वातावरण आहे तसेच आ सावकारे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे
या कामी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील , जळगाव जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक, भुसावळ तालुका विभागीय पोलीस उपाधीक्षक कृष्णांत पिगळे यांचेसह अनेकांचे सहकार्य लाभले