सरकारची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही – राष्ट्रीय जैन सेना संतप्त : भुसावळ शहरात प्रांताधिकारी यांना निवेदन

भुसावळ – 20 तीर्थंकरांची मोक्षभूमी, जैनांचे पवित्र तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी, मधुबन, झारखंड येथे
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या उपस्थितीत १९ जुलै रोजी चार प्राण्यांचा बळी देण्यात आला.

या घटनेमुळे देशभरातील जैन समाज संतप्त आहे.

याच्या निषेधार्थ राष्ट्रीय जैन सेना, राष्ट्रीय प्रमुख ललित गांधी, व उपप्रमुख संदीप भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय जैन सेना, आणि सकल जैन समाज यांनी भुसावळ शहरात प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन संपूर्ण पारसनाथ पर्वत परिसर आणि मधुबन शहर, प्राणी हिंसाचार प्रतिबंधित शहर म्हणून घोषित करून मुख्यमंत्र्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.*

राष्ट्रीय जैन सेना शाखेचे अध्यक्ष चेतन हेमावत जैन, उपाध्यक्ष गजेंद्र रुईकर, सचिव सतीश गोसावी, सदस्य योगेश वास्कर, ज्येष्ठ मार्गदर्शक अजय जैन, दि. जैन मंदिर चे सचिव दीपक काठे, रोखपाल रमेश अन्नदाते, तसेच जैन समाजातील मान्यवर उपस्थित होते.

सम्मेद शिखरजी हे जैन धर्माचे सर्वोच्च तीर्थक्षेत्र मानले जाते, जैन समाज अहिंसेच्या तत्त्वावर चालतो, आणि जैनांच्या या परम पवित्र तीर्थक्षेत्र वर पशू हत्या करणे हे असंवैधानिक आणि घृणास्पद कृत्य आहे, आणि तेही मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे अत्यंत निषेधार्ह आहे.