राज्यातील साडेसहा हजार पत्रकारांना जोडले `आयुष्यमान भारत’शी !व्हॉईस ऑफ मीडिया’चा सक्रिय पुढाकार; पत्रकारांपर्यंत पोहोचून उपलब्ध केली सुविधा

मुंबई, ता. २२ : व्हॉईस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय पत्रकारांच्या संघटनेने महाराष्ट्र राज्यातील साडेसहा हजार पत्रकारांना आरोग्य विम्याशी जोडले आहे. या सर्व पत्रकारांनाआयुष्यमान भारत’चे कार्ड उपलब्ध करून देऊन `व्हॉईस ऑफ मीडिया’ने आरोग्याची हमी घेतली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी आरोग्य कॅम्प घेत सर्व तपासण्या करत हा विमा काढण्यात आला आहे.

व्हॉईस ऑफ मीडिया’च्या आरोग्यविषयक पावलामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पत्रकारांना मोठी सुविधा निर्माण झाली आहे. व्हॉईस ऑफ मीडिया’ या संघटनेने जगातील ४३ पेक्षा अधिक देशांमध्ये आपल्या कार्याचा विस्तार केला आहे. महाराष्ट्रातून सुरुवात झालेल्या या संघटनेने पत्रकारांच्या निवास, निवृत्तिवेतन, पत्रकार भवन, आरोग्य व भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी राज्यभरातील पाच हजारपेक्षा जास्त पत्रकारांचा दहा लाख रुपयांचा विमा काढून दिला होता. त्यानंतर आता आयुष्यमान भारत’च्या माध्यमातून सुमारे पाच लाख रुपयांच्या वैद्यकीय सुविधांचा समावेश असलेली योजना प्रत्यक्ष पत्रकारांपर्यंत पोहोचून पत्रकारांना यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला. पत्रकार व त्यांच्या कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी वआयुष्यमान भारत’ कार्ड वाटप कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या सर्व आरोग्यविषयक चाचण्या मोफत करण्यात आल्या. त्याचे रिपोर्ट्स त्यांना सुपूर्द करण्यात आले.
पत्रकार व त्यांच्या परिवाराचे आरोग्य हे व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पंचसूत्रीतील एक सूत्र असल्याने प्रत्येक वर्षी अशा प्रकारची मोफत आरोग्य तपासणी केली जाते. आपल्या कामाच्या व्यापात, अवेळी जेवण इत्यादीमुळे पत्रकार स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. ही बाब लक्षात घेऊनव्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी राज्यभर आरोग्य कॅम्प घेण्यास सांगितले. या आरोग्य कॅम्पला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. आगामी काळात पत्रकार आणि त्यांच्या नातेवाईकांचाही विमा काढला जाणार आहे, त्यामध्ये पत्रकारांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य संयोजक तथा प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, प्रदेश उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ यांनी केले आहे

कुटुंब म्हणून काळजी घेणार –

संदीप काळे
राष्ट्रीय अध्यक्ष,

प्रत्येक पत्रकार हा आपल्या कुटुंबातील घटक आहे, असे समजूनच व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने त्याची काळजी घेण्याची आमची जबाबदारी आहे. टप्प्याटप्प्याने पत्रकारांच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी संघटना प्रयत्न करत आहे. आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठीआभा’ कार्ड हा त्यातलाच एक भाग आहे. यापुढेही असे विधायक उपक्रम निश्चितच राबविले जातील

व्हॉईस ऑफ मीडिया.

सकस पत्रकारितेसाठी सुदृढ पत्रकार हवा

समाजातील प्रत्येक घटकाला पत्रकाराकडून मोठी अपेक्षा असते, मात्र पत्रकार हा विपरीत परिस्थितीत कसे जीवन जगतो याकडे कोणी लक्ष देत नाही. या जाणिवेतूनच `व्हॉईस ऑफ मीडिया’चा उगम झालेला आहे. त्या दृष्टीने प्रत्येक पत्रकाराच्या आरोग्याची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे.
-अनिल म्हस्के

प्रदेशाध्यक्ष, व्हॉईस ऑफ मीडिया.

तळमळीतून संघटनेच्या कार्याची वाटचाल !

आपल्या संघटनेच्या प्रत्येक सदस्याची काळजी घेणारी संघटना म्हणून व्हॉईस ऑफ मीडिया’चा मला अभिमान वाटतो. पत्रकारांसाठीआयुष्यमान भारत’च्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्याची आपली भावना आहे. साडेसहा पत्रकारांना एकत्रित सुविधा देणारी संघटना म्हणून `व्हॉईस ऑफ मीडिया’ने इतिहास केला आहे. आम्ही पुढेही मदत करू.
-ओमप्रकाश शेट्ये
आयुष्मान भारत प्रमुख,
भारत सरकार.