भुसावळ- येथील जामनेर रोडवरील इंदिरा नगर जवळील डॉक्टर अर्चना खानापूरकर यांचे खानापूरकर मेटरनिटी हॉस्पिटल च्या मुख्य इलेक्ट्रिक पॅनलला आज सकाळी जवळपास साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. हे लक्षात येताच हॉस्पिटलचे कर्मचारी यांनी परिसरातील नागरिकांना आग लागली असल्याचे सांगितले. त्यावेळी त्या परिसरात उपस्थित असणारे दिलीप पाटील( टीसी),भगवान पाटील नितीन ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते शिशिर, जावळे, , नरेंद्र बऱ्हाटे,संजू बऱ्हाटे, जितू चीप्पड, पंकज सोनार ,अभिजीत चतुर सचिन जैन व इतर नागरिकांनी प्रसंगावधान दाखऊन त्या ठिकाणी धाव घेऊन त्या ठिकाणी त्या रुग्णालयातील अग्निशामक यंत्र तसेच वाळू माती च्या साह्याने आग विझवण्यास सुरुवात केली. सदर परिसरातील इंदिरा नगरातील तसेच पांडुरंग वाडीतील युवा कार्यकर्त्यांनी त्वरित विद्युत वितरण कंपनी तसेच अग्निशामक दल नगरपालिका यांना याबाबत कळविले लगेच त्या ठिकाणी भुसावळ नगरपालिका अग्निशामन दलाची टीम ही दाखल झाले. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अभियांता राहुल कवठे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत त्या ठिकाणी उपस्थित झाले. आणि नागरिकांसह या सर्वांनी त्या ठिकाणची होणारी आग आटोक्यात आणून फार मोठा नुकसान होण्यापासून वाचवण्याचे काम केले. खानापूरकर मेटरनिटी हॉस्पिटलचे डॉक्टर खानापूरकर या बाहेरगावी असल्याने त्या ठिकाणी नवजात शिशु आणि रुग्ण यांची उपस्थिती नव्हती .



