सरस्वती विद्या मंदिराचा निकाल ८४. ६१ टक्के : अंजली कोलते प्रथम तर योजना कुंभार द्वितीय ;


यावल, ता. २१ : येथील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी (कला शाखा) चा निकाल ८४.६१ टक्के लागला. यात अंजली विनायक कोलते ही ६४.१७ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम आली. तर योजना शिवराम कुंभार (६१.३३टक्के) हिने व्दितीय व सुफियान शाकिर खान (६० टक्के) याने तृतीय क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे
संस्थेचे आधारस्तंभ रमाकांत देशपांडे, व्यास प्रासादिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अरुण कुळकर्णी, श्रीकांत सराफ
तसेच प्राचार्य जी.डी.कुळकर्णी यांनी अभिनंदन केले.