भुसावळ – अक्षयतृतीया सणाचे आपल्या खानदेशात खूप महत्व आहे,या सणाच्या निमित्ताने सासरवाशीन माहेरात येते व आनंदाने माहेरच्यां सोबत रमून जाते ,ग्रामीण वभागात या सणा निम्मित झोके बांधले जातात ,सर्व सख्या एकत्रित येऊन खेळ खेळतात ,माहेरी आंब्याचा रस, पुरणाची पोळी कुरडई पापड यांचा मनसोक्त आस्वाद घेतात पण आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे हे सगळे चित्र आता दुर्मिळ होत चालले असे दिसते ,यासाठी प्रत्येक महिलेच्या मनातील माहेरची आठवण जिवंत राहून तिला माहेरची उणीव भासू नये म्हणून येथील
प्रतिष्ठा महिला मंडळा तर्फे अक्षयतृतीया निम्मित आठवणीतले माहेर या कार्यक्रमाचे आयोजन स्टार लॉन येथे भुसावळ तालुक्यातील सर्व माताभगिंनीसाठी केले . अतिशय सुंदर व बहारदार असा कार्यक्रम सादर केल्याने प्रतिष्ठा मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे .
कार्यक्रमाचे प्रारंभी गिरीश कुलकर्णी यांनी मतदानाचे महत्व पटवून देत सर्व माता भगिनींना मतदान करून इतरांना मतदान साठी प्रेरित करण्याचे आव्हान केले…

या कार्यक्रमाचे वैशि्ट्य म्हणजे महिलांना सजवलेल्या बैलगाडीतून कार्यक्रमस्थळी आणण्याची व्यवस्था करण्यात आली. सर्व महिलांसाठी आंब्याचा रस, पुरणाची पोळी , कटाची आमटी , कुरडई पापड यांचे जेवण देण्यात आले . मनसोक्त आस्वाद तसेच सर्व सवाष्ण महिलांना हळदीकुंकू देवून ओटी भरण्यात आली . स्टार लॉन येथे आयोजित या कार्यक्रमाला कार्यक्रम स्थळी बैलगाडी, झोके व वेगवेगळे सेल्फी पॉइंट सह मतदान करण्यासाठी जनजागृती करीत दोन वेगळे सेल्फी पॉइंट ठेवण्यात आले ज्याचा महिलांनी सेल्फी व फोटो घेवून मनशोक्त आनंद घेतला . मनोरंजनात्मक कार्यक्रम मधे वेगवेगळ्या स्पर्धा ठेवण्यात आल्या ज्यामधे नृत्य स्पर्धा, वेशभुषा स्पर्धा(एतिहासिक महान स्त्रिया) ,निबंध स्पर्धा,मेहंदी स्पर्धा,भारतीय नववधू स्पर्धा,संगीत खुर्ची तसेच वेगवेगळे गेम्स ठेवण्यात आले ज्यात महिला उत्साहाने सहभागी झाल्या.. तसेच लकी ड्रॉ द्वारे ३ महिलांना कस्तुरी साडी सेंटर तर्फे पैठणी देण्यात आली ..
या कार्यक्रमाची सुरुवात गणेशपूजन व गौरपुजन आमदार संजय सावकारे यांच्या मातोश्री सुशीलाबाई सावकारे,मुकेश खपली सर,गिरीश कुलकर्णी,रजनी जैन यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच नुपूर रमाकांत भालेराव हिच्या सुंदर नृत्याने झाली स्वागत या कार्यक्रमात विविध संस्थांचे अध्यक्ष,नगरसेविका, पंचायतसमितीचे माजी सभापती,सरपंच यांची उपस्थिती लाभली.
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सदस्यांनी अक्षयतृतीया चे महत्व,पारंपरिक खेळ झिम्मा,फुगडी तसेच सासरवाशिन महिलेचे रुसवेफुगवे सादर करीत उपस्थितांचे मन जिंकले. सकल लेवा समाज महिला मंडळातर्फे बहिना बाई चौधरी यांच्या ओवी सादर करीत आखाजी सणा चे महत्व सांगत सुंदर कार्यक्रम सादर केला..
परीक्षक म्हणून मुकेश खपली सर,रजनी जैन,राजेश्री देशमुख,अनिता आंबेकर लाभले..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश्री देशमुख यांनी उत्कृष्ठ पणे केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे सदस्य लता सोनवणे,अनिता आंबेकर, सोनल महाजन,वैशाली सैतवाल,राजेश्री देशमुख,वैशाली भगत,जयश्री चौधरी,वैशाली महाजन,वर्षा लोखंडे,राजश्री बादशाह,सारिका भारंबे, यांनी अथक परिश्रम घेतले.
विजेत्यांची नावे
@ निबंध स्पर्धा
१) ममता हरिमकर
२) हेमांगी पाटिल
३) विनी आहूजा
@ समूह न्रृत्य
१) नंदनवन ग्रुप
२) भंगाळे मँडम ग्रुप
३) अ. भा. दिगंबर महासमिती ग्रुप
@ प्रांतीय नववधू वेषभूषा स्पर्धा
१) स्वाती पाटील,२) सारिका जैन
३) तेजस्वी मकासरे
@ भारतीय कर्तबगार महान स्त्रिया वेशभूषा ( इतिहासकालीन व अर्वाचीन महिला )
१) गायत्री पाटिल
२) प्राची बाळापुरे
३) राजश्री लोखंडे
४) सायली जैन ( उत्तेजनार्थ )
@ मेहेंदी स्पर्धा
१) मेहक कार्डा२) योगिता भालेराव३)अफसाना शाह
@ संगित खुर्ची
१) सौ. निता सचीन इंगळे२) मयुरी जैन ३) वैशाली चौधरी
@ गेम्स
४ विजेत्यांना बक्षीस
@उखाणे
५ महिलांना बक्षीस





