भुसावळ – आजच्या धकाधकीच्या जिवनात गैरसमजातून क्षुल्लक कारणाने समाजात कौटुंबिक कलह वाढत आहे यामुळे घटस्फोटाचे प्रमानात वाढ होत आहे हे ताण तणाव दूर होण्यासाठी सकल लेवा पाटीदार समाजाची समन्वय समितीने अत्यंत चांगला निर्णय घेऊन तुटलेली मन” जोडन्याचे कार्य हाती घेतले आहे यातून या समाजकार्यात “तुटलेली मन” जोडणे आवश्यक आहे, असे मत ह.भ.प. भरत महाराज यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले

येथील जामनेर रोड वरील सोनीच्छा वाडी येथे सकल लेवा पाटीदार समाजाची समन्वय समितीचे ह. भ. प. भरतजी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी मोठय़ा प्रमाणात समाजातील मान्यवर उपस्थित होते.
सर्व प्रथम दिप प्रज्ज्वलन करून फित कापण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी युवा नेतृत्व ललित रमेश पाटील होते. यावेळी नुतन समन्वय समितीचे अध्यक्ष सुहास चौधरी यांचे नाव सर्वानुमते जाहीर करण्यात आले.
सर्व प्रथम सुहास चौधरी यांनी प्रास्ताविक केले त्यात त्यांनी समन्वय समितीचा उद्देश व योजना याबद्दल विस्तृत माहिती दिली. फक्त वैवाहिक आयुष्यातील अडचणींबरोबर समाजातील लहान मुल, शैक्षणिक अडचणी, युवक युवती, जेष्ठ नागरिक या साठी कार्य करण्याचा मानस असल्याने स्पष्ट केले. .
या नंतर
ह.भ.प. भरत महाराज यांनी आपल्या विचारात सांगितले की समाजकार्यात “तुटलेली मन” जोडणे आवश्यक आहे,
त्या नंतर आरती चौधरी यांनी सांगितले की जेव्हा समाजासाठी काही चांगलं करण्याची इच्छा मनापासून होते तेव्हा समजावं की माणुसकी अजूनही जिवंत आहे.
याच माणुसकीच्या नात्यातून आज या समन्वय समितीचा शुभारंभ येथे आज होत आहे.
अखिल भारतीय लेवा संघाचे अध्यक्ष अरूण बोरोले यांनी सांगितले की सर्वानी एकत्र येऊन कार्य करणे आवश्यक आहे.
नरेंद्र नारखेडे फैजपूर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की सामाजिक समस्या, अडचणी, सोडवण्यासाठी काम करावे लागेल , अनेक तरुणांची लग्न होत नाही मुली मिळत नाहीत, व्यसन, बेरोजगारी वाढली आहे, हे समाजाचे विदारक चित्र आहे. पण सकारात्मक बाजू ही आहे की यशाची शिखरे गाठली आहेत पण समाजाच्या खालच्या घटकांना मदत होईल व समितीने मदतीने समस्या सुटतील अशी आशा आहे.
सुत्रसंचलन कावेरी चौधरी यांनी केले.
शेवटी माजी आमदार निळकंठ फालक यांनी नविन दृष्टीकोन व नविन विचारांनी या समितीची स्थापना झाली आहे.
कार्याची व्याप्ती मर्यादित राहणार नाही. एक चांगला उद्देश, ध्येय ठेवून, ही समिती कार्य करणार आहे.
समन्वय समितीची कार्यकारीणी पुढील प्रमाणे
सुहास चौधरी (अध्यक्ष) , निळकंठ फालक , सुभाषचंद्र भंगाळे
रघुनाथ गिरधर चौधरी , अरुण नारायण चौधरी , महेश फालक
हरीष फालक , परिक्षीत ब-हाटे , शरद फेगडे , आरती चौधरी
मंगला पाटील , कावेरी चौधरी ,लालचंद पाटील ,अनिल वारके
सुधाकर जावळे , धीरज पाटील , चंद्रकांत चौधरी , तसेच
आमंत्रित सदस्य म्हणून संजय पाटील , सुभाष झांबरे ,
आभार प्रदर्शन सुभाषचंद्र भंगाळे यांनी केले.
या प्रसंगी जिल्ह्यासह तालुक्यातील यात जळगाव, पाडळसे, सावदा,, मस्कावद आदि ठिकाणाहून समाज बांधव उपस्थित होते .
जोत्स्ना ब-हाटे, ज्योती महाजन, डॉ. प्रियदर्शनी सरोदे, सरलाताई वारके. नीला चौधरी, गीता चौधरी, नीता वराडे,पुनम भरत पाटील,डाॅ. मिलींद पाटील, वा. पी. ब-हाटे, पी. व्ही. पाटील, किरण महाजन, अशोक चौधरी, प्रमोद नेमाडे,
नितीन भोळे ,मा. नगराध्यक्ष उमेश नेमाडे , निळकंठ भारंबे
दिपक फालक ,गोविंदा ढाके , सुरेश जावळे ,संजय पाटील ,
सुधीर बेंडाळे , जगदीश फिरके , मनोज जावळे , आर. एस. पाटील , प्रमोद सरोदे , किरण रमेश महाजन ,निलेश भोळे
राजेंद्र मुरलीधर पाटील ,उल्हास महाजन , प्रमोद सरोदे ,
नयना कीशोर ढाके , सीमा धिरज पाटील , उल्हास पाटील ,स्नेहल बढे ,पांडूरंग तळेले , उल्हास सदाशिव महाजन आदी .
पंढरीनाथ बोरोले
निळकंठ रामदास भारंबे
सचीन प्रमोद भोळे
पंडीतराव कोल्हे
विनायक मामा पाचपांडे
उल्हास पाटील (वरणगांव)
या शिवाय अनेक मान्यवर उपस्थित होते.


