जिल्ह्यात १ लाख ५७ हजार ३६० मतदारांची वाढ -आयुष प्रसाद

जळगाव ;-– १३ मे रोजी झालेल्या रावेर आणि जळगाव लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मतदार संख्या वाढीत जळगाव किल्ह्याचा समावेश झाला असून जिल्ह्यात १ लाख ५७ हजार ३६० मतदारांची वाढ म्हणजेच ७. ९१ टक्के झाली असून तालुकानिहाय आकडेवारी बघितल्यास सर्वाधिक मतदार जळगाव शहर मतदार संघात असे २२ हजार २५० मतदार वाढले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर जामनेर आणि तिसऱ्या क्रमांकावर रावेर तालुक्यात मतदारांच्या संख्येत वाढ झाल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

दोन्ही मतदार संघामध्ये २१ लाख ४४ हजार मतदारांनी मतदान केले आहे तसेच सर्वाधिक मतदान जळगाव शहर ,रावेर आणि चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक मतदान झाले. कर्मचाऱ्यांचे सहकार्य , मतदानाबाबत जनजागृतीपर कार्यक्रम राबविल्याने हि निवडणूक पारदर्शकपणे पार पाडता आली आणि चोखपणे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघात कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून राजकीय पक्षांच्या कुठल्याही तक्रारी आल्या नाहीत याबाबत जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.