भुसावळ - लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 अंतर्गत 12- भुसावळ विधानसभा मतदारसंघ करिता भुसावळ येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ई व्ही एम मशीन तसेच साहित्य वाटपची प्रक्रिया आज दिनांक 12-05-2024 रोजी कडेकोट बंदोबस्तात सकाळी 8:00 वाजेपासून सुरु झालेली प्रक्रिया दुपारी 12:00 वाजेपर्यंत सुरु होती. त्यानंतर नेमून दिलेल्या बसेस द्वारे कर्मचाऱ्यांनी आपले साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांनी यांनी evm मशीन व साहित्य वाटप प्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक व अचूकपणे पूर्ण केली. 316 बूथ चे साहित्य वाटपाकरिता एकूण 20 टेबलवर प्रत्येकी 5 कर्मचारी कार्यरत होते.
रविवार रोजी रावेर लोकसभा मतदारसंघकारिता नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे यांनी संबंधित ठिकाणी पाहणी केली. तसेच 12-भुसावळचे विधानसभा मतदार संघाचे सहा. निवडणूक
निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी भुसावळ जितेंद्र पाटील,मा.तहसीलदार नीता लबडे मॅडम, निवडणूक नायब तहसीलदार अंगद आसटकर सो. उपस्थित होते.



