भुसावळ - लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 अंतर्गत 12- भुसावळ विधानसभा अंतर्गत भुसावळ येथे जामनेर रोडवरील रस्त्याच्या कडेला विदेशी दारूचा साठा आढळून आला.भुसावळ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्र.1 व 2 यांनी ही कार्यवाही केली. साधारण 18,000 हजार रुपये अंदाजे किंमतीचे 21लिटर मद्य आज दिनांक 12-05-2024 रोजी बेवारस स्थितीत आढळून आले. सदरची बाब लक्षात आल्यानंतर पथकाने धडक कार्यवाही केली.सदरील मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांचे कडे ताब्यात देण्यात आला आहे.


