यावल : फैजपूर शहरातील भुसावळ रस्त्यावर टीव्हीएस शोरूमच्या पुढे चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला होता तर एक जण जखमी झाला होता. बुधवार, 1 मे रोजी घडलेल्या अपघातप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणाचा जागीच मृत्यू
फैजपूर शहरातील भुसावळ जाणार्या रस्त्यावर टीव्हीएस शोरूम आहे. या शोरूमच्या पुढे 1 मे रोजी मोटरसायकल (क्रमांक एम.एच.19 डी.डब्ल्यू. 7248) घेऊन प्रमोद उर्फ पुष्पक देविदास पवार (24, रा.खिरोदा) आणि मंगेश दत्तात्रय बोंडे (खिरोदा) हे जात असताना त्यांच्या मोटरसायकलला भुसाव कडे जाणार्या एका अज्ञात वाहन चालकाने धडक दिली. या अपघातामध्ये प्रमोद उर्फ पुष्पक पवार हा जागीच ठार झाला तर मंगेश बोंडे हा जखमी झाला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात रुपेश ज्ञानेश्वर हडपे (खिरोदा, ता.रावेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे करीत आहे.


