होय मी मतदान नक्की करणार : सर्व धावपटूंनी शपथ घेऊन व्यक्त केला निर्धार “


भुसावळ – रविवारी १३ मे रोजी संपन्न होणाऱ्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्याचा निर्धार व्यक्त करतांना सदरचे मतदान प्रत्येक धावपटू धर्म, जात,वंश,भाषा, समाज यांच्या प्रभावाखाली न येता तसेच कुठल्याही प्रलोभनास बळी न पडता करणार अशी सामूहिक शपथ भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सर्व धावपटूंनी घेतली. यावेळी पन्नासहून अधिक महिला व पुरुष धावपटूंची उपस्थिती होती.
भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे नियमित रनिंगचे सरावसत्र संपन्न झाल्यानंतर असोसिएशनचे प्रमुख प्रविण फालक यांनी सर्व सदस्यांना मतदानाची शपथ दिली. त्याचबरोबर मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे हे देखील नमूद केले. यावेळी प्रविण पाटील यांनी सांगितले कि प्रत्येक मतदानावेळी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सर्व धावपटू आपापल्या मतदान केंद्रावर अगदी सकाळी सर्वप्रथम मतदान करतात. यावेळी देखील ही परंपरा सर्व धावपटू कायम ठेवतील अशी अपेक्षा देखील त्यांनी बोलून दाखवली.
यावेळी डॉ मिनाक्षी महाजन, स्वाती फालक, डॉ वर्षा वाडिले, गरिमा न्याती, अर्चना चौधरी, माधुरी चौधरी, सरला पाटील,गुंजन गुप्ता,रीना परदेशी, मनिषा सिंग,रितू कुशवाह,जयश्री चौधरी,शीला कश्यप, प्रीती शुक्ला,सीमा वायकर,विनिता चौधरी,गुड्डी देवी,पिंकी सिंग आदी महिला सदस्यांसोबत गणसिंग पाटील,प्रविण वारके,प्रशांत वंजारी,मंगेश चंदन,विश्वजीत वाघ,अभिजीत शिंदे,डॉ निर्मल बलके,मंगेश यादव,महेंद्र पाटील, डॉ सुनील वाडिले,राजेंद्र घाटे,सुभाष चौधरी,गोविंदा भंगाळे,जितेंद्र चौधरी आदी पुरुष धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.