रेल्वे उन्हाळी विशेष गाड्या चालवणार :



अधिक गाड्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि उन्हाळी हंगामात आरामदायी प्रवास देण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने अहमदाबाद ते खुर्दा रोड , सुरत ते खुर्दा रोड आणि सुरत ते ब्रह्मपूर दरम्यान उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विवरण खालीलप्रमाणे –
1) अहमदाबाद – खुर्दा रोड – उधना उन्हाळी विशेष ट्रेन ( ८ फेरी )
०९४२३ विशेष अहमदाबाद येथून दिनांक १५.०५.२०२४, १७.०५.२०२४, २२.०५.२०२४ आणि २९.०५.२०२४ रोजी १९.१० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १२.०० वाजता खुर्दा रोड येथे पोहोचेल. (०४ फेऱ्या)
०९४२४ विशेष खुर्दा रोड येथून दिनांक १७.०५.२०२४, १९.०५.२०२४, २४.०५.२०२४ आणि ३१.०५.२०२४ रोजी १६.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०१.०० वाजता उधना येथे पोहोचेल. (०४ फेऱ्या)
थांबे – नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, राजनंदगाव, दुर्ग, रायपूर, कांताबंजी, तितलागढ़, बांलगीर, हिराकुड, संबळपूर, रायराखोल, अंगुल, तलचेर, धेंकनाल आणि भुवनेश्वर दोन्ही दिशांना. ट्रेन नं 09423 ला वडोदरा, सुरत आणि उधना स्टेशनवर अतिरिक्त थांबे असतील.
संरचना – २० स्लीपर क्लास आणि ०२ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन. (२२ डब्बे)
2) सुरत ते ब्रह्मपूर उन्हाळी विशेष ट्रेन ( १२ फेरी )
०९०५९ विशेष सुरत येथून दिनांक २२.०५.२०२४ ते २६.०६.२०२४ पर्यंत दर बुधवारी १४.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २०.१५ वाजता ब्रह्मपूर येथे पोहोचेल. (०६ फेऱ्या)
०९०६० विशेष ब्रह्मपूर येथून दिनांक २४.०५.२०२४ ते २८.०६.२०२४ पर्यंत दर शुक्रवारी ०४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १४.४५ वाजता सुरत येथे पोहोचेल. (०६ फेऱ्या)
थांबे – नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, राजनंदगाव, दुर्ग, रायपूर, कांताबंजी, तितलागढ़, केसिंगा, मुनीगुडा, सिंगापूर रोड, रायगडा, पार्वतीपुरम, विजयनगरम, श्रीकाकुलम रोड आणि पालासा.
संरचना: एक वातानुकूलित प्रथम , दोन वातानुकूलित द्वितीय , ६ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ३ जनरल सेकंड क्लाससह १ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन.
3) सुरत – खुर्दा रोड – उधना उन्हाळी विशेष ट्रेन ( २ फेरी )
०९०१९ विशेष सुरत येथून दिनांक १६.०५.२०२४ रोजी २३.५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १२.०० वाजता खुर्दा रोड येथे पोहोचेल. (०१ फेरी)
०९०२० विशेष खुर्दा रोड येथून दिनांक १८.०५.२०२४ रोजी १६.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०१.०० वाजता उधना येथे पोहोचेल. (०१ फेरी) )
थांबे – नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, राजनंदगाव, दुर्ग, रायपूर, कांताबंजी, तितलागढ़, बांलगीर, हिराकुड, संबळपूर, रायराखोल, अंगुल, तलचेर, धेंकनाल आणि भुवनेश्वर
संरचना – १८ स्लीपर क्लास आणि ०२ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन. (२० डब्बे)
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस (NTES) ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.