मोहाडीत जुगाराच्या वादातून दोन गटात वाद ; दगडफेकी नंतर तणाव

जळगाव ;- अक्षय तृतीयानिमित्त जुगार सुरू असताना झालेल्या वादातून मोहाडी रोडवरील जगवानी पेट्रोल पंपाजवळ दोन गटात तुफान दगडफेक होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची घटना शहरातील मोहाडी गावात शुक्रवारी १० मे रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली या दगडफेकमुळे एका वाहनाचे नुकसान झाले. . घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले .

जळगाव शहरापासून जवळ असलेल्या मोहाडी गावात अक्षयतृतीयेच्या निमित्ताने शुक्रवारी १० मे रोजी पत्ते खेळण्याचा डाव सुरू होता. यामध्ये पत्ते खेळत असताना एकासोबत वाद झाल्याने एकाला मारहाण करण्यात आली. सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मोहाडीरोड वरील इम्पेरियल अपार्टमेंट जवळील जगवानी आणि पेट्रोल पंपासमोर दुपारच्या वादातून दोन गट एकमेकांना भिडले. दोन गटातील हा वाद जास्त वाढल्याने काही तरुणांनी दगडफेक केली. त्यामुळे संतप्त झालेल्या दोन्ही गटातील व्यक्तींनी एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यास सुरूवात केली. या दगडफेकीमध्ये रस्त्यावर उभी असलेली एक चारचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे यांच्या घरावर देखील दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या घराच्या गॅलरीत आणि खिडकीचे काच फोडले गेल्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.कॉ. नाना तायडे व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळविले..