मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा ; मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण ; प्रशासनाकडून मतदान केंद्रावर विविध सुविधा ;


जळगाव ;– जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. मतदान अवघ्या तासांवर राहिले असून मतदारांनी मतदानाचा हक्क बजवायचा आहे , त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या व्हिडिओद्वारे समाजमाध्यमातून या सुविधांबाबत नागरिकांना माहिती दिली जात आहे. या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली . स्थानिक प्रांताधिकारी कार्यालयात शुक्रवार रोजी सायंकाळी आयोजीत पत्रकार परिषदेत अप्पर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे , प्रांताधिकारी जितेंद्र पाटील , मुखाधिकारी महेश वाघमोडे , जिमाकाचे युवराज पाटील उपस्थित होते . यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की यंदा वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता नागरिकांना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर विविध स्वरूपाच्या सुविधा जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुरविण्यात येत आहे.यामध्ये प्रामुख्याने दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी व्हीलचेअर, स्तनदा माता, लहान अपत्ये असलेल्या महिला मतदारांसाठी पाळणाघर, गरोदर महिलांसाठी स्वतंत्र रांग, त्यांच्या मदतीसाठी आशा वर्कर त्याचप्रमाणे पडदानशी महिलांनी निसंकोचपणे मतदान करावे कारण त्यांचे ओळख पटविण्याकरिता खास महिला पथक तैनात करण्यात आले आहे .यासह शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, मतदान केंद्र बाहेर सावली करीता मंडपाची व्यवस्था वैद्यकीय अधिकारी , नर्स स्टाफ , बेड , अशा स्वरूपाच्या विविध सोयी सुविधा जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहेत.तरी मतदारांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य हक्क बजावण्याकरीता जास्तीत जास्त मतदान करावे . लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा संघ आहे . त्यात १८ लाख २१ हजार ७५० मतदार संख्या आहेत . तर १ हजार ९०४ मतदान केंद्र असून ११हजार कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहे . दिनांक १२ रोजी सकाळी ८ वाजेपासून कर्मचाऱ्याना दिले जाणार आहे दुपारी २ वाजेपर्यंत सर्व कर्मचारी त्यांना दिलेल्या मतदान केंद्रावर पोहचणार आहे . ५०टक्के मतदार केंद्रावर वेबकास्टिंग होणार असून तेथील स्थिती लाईव्ह दिसणार आहे . १४७ ठिकाणी मायक्रो निरीक्षक राहणार असून प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर केंद्रीय सुरक्षा बलाची नियुक्ती करण्यात आली असून सुरक्षित मतदान करण्यासाठी 1950 नंबर वर कॉल करा असे आवाहन करण्यात आले आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने 306 एपिसोड परवाने रद्द करण्यात आले आहे साडेचार हजार पेक्षा जास्त उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून 150 हद्दपार करण्यात आलेले आहे निवडणूक कामात वापरण्यात येणाऱ्या सर्वच वाहनांना जीपीएस लावण्यात आले असून चालकांचीही तपासणी करण्यात आली आहे . पोलीस अधीक्षक सहाय्यक पोलीस अधीक्षक व पोलीस अधिकारी यांच्या पोलीस बंदोबस्तात सर्व मतदान केंद्रांवर अतिशय सूक्ष्म असे निरीक्षण कर्मचारी करीत असून संवेदनशील मतदान केंद्रांवर बीएसएफची तुकडी ,राज्य राखीव पोलीस दल , सेंट्रल पोलीस फोर्स , तैनात करण्यात आलेले आहे .सात टप्प्यांमध्ये प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे यामध्ये लेक्चर उदाहरण अभ्यास डेमोस्ट्रेशन, विशेष घटक प्रशिक्षण , ड्रिल प्रश्नपत्रिका देऊन परीक्षा घेण्यात आली यामध्ये ऑडिओ व्हिडिओ लिविंग मटेरियल याबाबत प्रशिक्षण देण्यात आले .मतदान जनजागृतीच्या प्रशिक्षणामध्ये गैरहजर राहण्याचे अर्जाचे प्रमाण यंदा कमी झाले होते अतिशय सुरळीत आणि सुंदर असे प्रशिक्षण झालेले असून यंदा मतदानाची टक्केवारी नक्की वाढेल असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केला . तसेच मतदारांमध्ये जनजागृती व्हावी जास्तीत जास्त मतदान व्हावे मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हास्तरावरून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा घेण्यात आल्या असून युवा वर्गासह मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी बक्षिस देण्यात येणार आहे यामध्ये हेडफोन घड्याळ इयरफोन म्युझिक सिस्टीम जॅकेट टी-शर्ट अशी बक्षीसे ठेवण्यात आलेले आहे फर्स्ट टाइम वोटर यांनी सगळ्यात आधी जाऊन आपले मतदान करावे , जास्तीत जास्त महिलांनी मतदान करावे असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले