भुसावळ – ,
4-रावेर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत १२-भुसावळ विधानसभा मतदार संघाकरीता मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे शेवटचे प्रशिक्षण पांडुरंग टॉकिज भुसावळ येथे दोन सत्रात पार पडले. भुसावळ करिता दुसऱ्या तालुक्यातील कर्मचारी नियुक्त झालेले असून त्यांच्या करिता आज दिनांक 6 मे 2024 रोजी सकाळी 10 ते 12 व 1 ते 3 असे झाले प्रशिक्षण आणि E.V.M हाताळणी प्रशिक्षण म्यूनिसिपल हायस्कूल जामनेर रोड शाळेत पार पडले. प्रत्यक्ष E.V.M हाताळणी करून मतदान अधिकारी,कर्मचाऱ्यांना सदर प्रशिक्षण कार्यक्रमात मतदान प्रक्रियेतील अडी अडचणी, पारदर्शक मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली .

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भुसावळ जितेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये .तहसीलदार नीता लबडे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.यावेळी अंगद आसटकर निवडणूक नायब तहसीलदार यांनी प्रशिक्षणाचे आयोजन केले.
आजच्या शेवटच्या टप्प्यातं घेण्यात आलेल्या प्रशिक्षणात एकूण 1038 पैकी 1021 कर्मचारी हजर होते.



