रावेर –
मध्यप्रदेश महाराष्ट्र सीमेवरील शेरी नाका पोलिस चौकी वरून ब्यारिकेट तोडून फरार झालेला गोवंश ने कोंबून भरलेली ट्रक पोलिसांनी आठ ते दहा किलो मीटर अंतरावर सिनेस्टाईल ने पाठलाग करत सहस्त्रलिंग येथे पकडला चालक ट्रक सोडून पसार झाला ट्रक मध्ये गोऱ्हे व बैल कोंबून भरलेले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले
सविस्तर वृत्त असे की भुसावळ-चित्तोडगड महामार्गावर 6/5/2024 रविवार रोजी रात्री नऊ वाजता
पो को दीपक ठाकूर आणि पो को चेतन पाटील हे लोक सभा निवडणुकीनिमित्त सीमेवर बंदोबस्तावर असताना त्यांना मध्यप्रदेशातून रावेर कडे जाणाऱ्या ट्रक वर संशय आला त्यांनी ट्रक क्रमानं.न MP37GA3342 या ट्रक वरील चालकाला ट्रक बाजूला लावण्यास सांगितले असता चालकाने न थांबता गाडीचा वेग वाढून तेथून पसार झाला पोलिस गावातील नागरिकांना सूचना देऊन पोलिस व ग्रामस्थांनी त्या गाडीचा सिनेस्टाईल ने पाठलाग केला तो ट्रक गावातून जाताना अनेक ठिकाणी गाड्यांना कट मारून गावातून पसार झाला पाल पोलिस व ग्रामस्थांनी पाठलाग करत पाल पासून आठ किमी अंतरावर सहस्रलिंग येथील हनुमान मंदिर जवळ चालक गाडी सोडून फरार झाला
ट्रकच्या मागच्या बाजूस कुट्टीचे पोते भरलेली थप्पी लाऊन वरून त्रिपाल टाकून मध्ये छोटे गोऱ्हे व बैल एकूण सदोतीस गुरे एकमेकावर निर्दय पने बांधून कोंबून भरलेले अवस्थेत होते त्यातील पाच बैल मरण पावलेले होते आणि बत्तीस जिवंत आढळले
यावेळी नवीन पवार,संतोष राठोड,गोरेलाल चव्हाण,रवींद्र जाधव,विनय पवार,प्रदीप जाधव तसेच सहस्त्रलिंग येथील युवकांनी पोलिसांना सहकार्य केले.पो उपनिक्षक सचिन नवले पो हे को कल्पेश अमोदकर,विष्णू भील जगदीश पाटील यांनी गाडीची पाहणी करून गुरांना जलगाव येथील गौशाळेत पाठविण्यात आले पुढील तपास पाल पोलिस करत आहे



