मध्य रेल्वे मुंबई आणि वाराणसी दरम्यान प्रवाशांच्या गरजेनुसार ८ अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन चालवणार आहे.

रेल्वेने उन्हाळी हंगामात मुंबई ते उत्तरेकडे जाणाऱ्या अधिक गाड्यांसाठी प्रवाशांची गरज लक्षात घेता तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई आणि वाराणसी दरम्यान ८ अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेतः
लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी साप्ताहिक विशेष (८ फेर्या)
04227 साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून दि. ०६.०५.२०२४ ते दि २७.०५.२०२४ दर सोमवारी १३.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३.२० वाजता वाराणसी येथे पोहोचेल. (४ फेर्या)
04228 साप्ताहिक विशेष वाराणसी येथून दि. ०४.०५.२०२४ ते दि २५.०५.२०२४ दर शनिवारी २२.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे तिसऱ्या दिवशी १०.३० वाजता पोहोचेल. (४ फेर्या)
थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपुर, लखनऊ, अयोध्या छावनी, अयोध्या, शाहगंज आणि जौनपुर
संरचना: एक वातानुकूलित- द्वितीय, दोन वातानुकूलित- तृतीय, ८ शयनयान, २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ११ सामान्य द्वितीय श्रेणी.
आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 04227 चे बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कावर दि. ०८.०५.२०२४ रोजी उघडेल.
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


