भुसावळ – येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भुसावळ येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील ईव्हीएम गार्ड गोडाऊन व परिसराची पाहणी शुक्रवारी संध्याकाळी निवडणूक निरीक्षक यांनी केली.

यावेळी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक जळगाव लोकसभा मतदारसंघ डॉ. राहुल गुप्ता, रावेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक अशोक कुमार मीना, खर्च निवडणूक निरीक्षक चंदन कुमार, संदीपन खान, निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर तसेच जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांचेसह भुसावळचे प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे, निवडणूक नायब तहसीलदार अंगद असटकर आदी उपस्थित होते.


