भाजपाला सत्तेतून तडीपार करा : भुसावळात शिवसेनेचे जिल्हा संपर्क नेते संजय सावंत – 35 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश :

भुसावळ : दिल्लीच्या सत्तेवर बसलेल्या भाजपाला तडीपार करा व रावेर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन जळगाव जिल्हा शिवसेनेचे संपर्क नेते संजय सावंत यांनी येथे केले. भुसावळातील शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, भुसावळ येथे शिवसेनेचे जोरदार काम होते. भुसावळकरांनी शिवसेनेच्या उमेदवाराला विधानसभेत दोनदा संधी दिली होती. जिल्हा परिषद व नगरपालिकेतही शिवसेनेची सत्ता होती. आगामी काळात होणार्‍या नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने तयारी करावी, असे आवाहन त्यांनी पदाधिकार्‍यांना केले.
या मेळाव्यात प्रारंभी मान्यवर जिल्हा संपर्क नेते संजय सावंत यांचे स्वागत शहर प्रमुख दीपक धांडे यांनी केले. जळगाव जिल्हा प्रमुख दीपक सिंह राजपूत यांचे स्वागत कैलास लोखंडे, माजी आमदार दिलीप भोळे यांचे शरद जैस्वाल, जळगाव जिल्हा संघटक गजानन मालपूरे यांचे निलेश महाजन, माजी जिल्हा प्रमुख जगदीश कापडे यांचे स्वागत मुकेश गुंजाळ, माजी नगराध्यक्ष नईम खान, चंद्रकांत शर्मा यांचे माजी सभापती वाणी यांनी स्वागत केले. गजानन मालपूरे, अ‍ॅड.जगदीश कापडे, दीपकसिंह राजपूत, संतोष सोनवणे यांनी विचार मांडले
शिवसेनेच्या मेळाव्यात 35 तरूण कार्यकर्त्यांनी संजय सावंत यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत करण्यात आले. मेळाव्याचे प्रास्ताविक माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे यांनी केले. या मेळाव्यात शिवसेना पाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.