सावदा –

हातात निळे झेंडे, डोक्यावर निळे फेटे व हाती बाबा साहेबांचे फोटो सोबत प्रकाश आंबेडकरांचे फोटो घेऊन जय भीमचा जयघोष अशा वातावरणात सावदा शहरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ची आज मिरवणूक काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त याचे आयोजन केले होते.
सकाळ पासूनच येथील बस स्टॅन्ड जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी विविध स्तरातील नागरिक पदाधिकारी राजकीय मंडळी तसेच आंबेडकर अनुयायी यांनी गर्दी केली होती, दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांनी येथे येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चरणी नतमस्तक झालेले दिसले यात विद्यमान खा. रक्षा खडसे, आ. चंद्रकांत पाटील, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राम्हणे, यांचे सह अनेक राजकीय नेत्यांनी येथे येऊन अभिवादन, सावदा पत्रकार बांधव व सावदा पोलीस स्टेशन तर्फे स.पो.नी. जालिंदर पळे व सहकारी यानी अभिवादन केले, सकाळी शहरातून मोटारसायकल रॅली देखील काढण्यात आली होती तर संध्याकाळी डॉ. आंबेडकर यांचा पुतळा ट्रॅक्टरमध्ये ठेवण्यात आला व ध्वनीक्षेपकावर सायंकाळी भीमगीते लावण्यात आली. परिसरातील असंख्य भीमसैनिक सहभागी झाले होते.


