भालोद –
कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . .कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे यांनी प्रतिमेचे पूजन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन तसेच शैक्षणिक,सामाजिक, वैचारिक,मानवतावादी कार्य याविषयी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी प्राचार्य म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला सर्वोत्कृष्ट असे संविधान दिले. याचबरोबर समाजात मानवता, सर्वधर्मसमभाव वृत्ती, एकात्मता वाढीस लागावी यासाठी मौल्यवान अशी विचारधारा दिली. सदर कार्यक्रम प्रसंगी मराठी विभागप्रमुख डॉ. जतीन मेढे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. दिनेश पाटील यांनी केले.


