ईदच्या दिवशी युवकाचा धरणात बुडून मृत्यू :

सावदा – ईदच्या दिवशी सावदा येथे दुःखद घटना घडली आहे. इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असलेला सावदा येथील ख्वाजानगर परिसरातील शे. ताबिश शे. रमजान मोमीन (वय १५) याचा धरणात बुडून मृत्यू झाला.

शेख ताबिश शेख रमजान मोमीन हा आपल्या चार ते पाच मित्रांसोबत सकाळच्या ईदगाहवरील सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर गारबर्डी धरणावर फिरायला गेला. यावेळी पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. याच्या पश्चात एक मोठा आणि एक लहान भाऊ आहेत. ऐन ईदच्या दिवशी घरातील एक तरुण मुलगा गेल्याने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आकस्मित जाण्याने ख्वाजानगर भागात एकच शोककळा पसरली आहे.