भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे राम नवमीनिमित्त दि.१७ रोजी महाप्रसादाचे आयाेजन करण्यात आलेले आहे .
दरम्यान १७ रोजी प्रारंभी श्रींचे स्नान अभिषेक पूजा सकाळी ५:३०. ते ७:३० हाेईल. तद्नंतर दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव होऊन विधिवत पूजन करण्यात येईल तसेच राम जन्माेत्सवानिमित्त पाळणा गीत सादर केले जाईल, तरी या सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी.

तसेच ज्या भाविकांना महाप्रसादासाठी गहु, तुरदाळ, तेल, राजगिरा लाडू अथवा देणगी द्यावयाची असल्यास त्यांनी जामनेर राेडवरील गजानन महाराज देवस्थान पदाधिका-यांशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.


