रेल्वेच्या उन्हाळी विशेष गाड्या चालवणार


भुसावळ – रेल्वे उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी लक्षात घेऊन रेल्वे द्वारा सिकंदराबाद ते उदयपूर उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः
सिकंदराबाद ते उदयपूर उन्हाळी विशेष रेल्वे सेवा
07123 साप्ताहिक विशेष गाडी मंगळवारी दिनांक 16.04.2024 आणि 23.04.2024 रोजी सिकंदराबाद येथून 23.50 वाजता सुटेल आणि उदयपुर येथे तिसऱ्या दिवशी 17.45 वाजता पोहोचेल. (2 फेरी )
07124 साप्ताहिक विशेष गाडी शनिवारी दिनांक 20.04.2024 आणि 27.04.2024 रोजी उदयपुर येथून 16.05 वाजता सुटेल आणि सिकंदराबाद येथे तिसऱ्या दिवशी 09.45 वाजता पोहोचेल. (2 फेरी )
थांबे – बोलारूम, मेडचल, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड़, पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, इटारसी, भोपाल, संत हिरदाराम नगर, सुजालपुर, उज्जैन, नागदा, शामगढ़, कोटा, सवाई माधवपुर, जयपुर, मदार, अजमेर, नसीराबाद, बिजयनगर, भीलवाड़ा, चंदेरिया, बेराच, मावली आणि राणाप्रताप नगर
संरचना: 1 प्रथम वातानुकूलित , 2 वातानुकूलित -2 टियर 6 वातानुकूलित -3 टियर, 10 शयनयान श्रेणी, 2 द्वितीय श्रेणी , 2 लगेज कम गार्ड ब्रेक वैन
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.