घरफोडीच्या गुन्ह्यात वॉण्टेड आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी केली अटक :

जळगाव : यावल पोलिसांना घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेल्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्यास पुढील तपासकामी यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना आरोपी रवी चव्हाण याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्या वरून त्यांनी पथकास कारवाईचे निर्देश दिले. जळगावच्या मेहरुण परिसरातील शेरा चौकातून रवी प्रकाश चव्हाण या आरोपीला अटक केली आली.

एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलसी उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल पंजारी, हवालदार गणेश शिरसाळे, नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, नितीन ठाकुर, मुकेश पाटील आदींनी ही कारवाई केली.