भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे यांच्या गतिशील नेतृत्वाखाली आणि मुख्य प्रकल्प व्यवस्थापक एम के मीना , गती शक्ती युनिट नवीन पायाभूत सुविधा प्रकल्प जलद गतीने पूर्ण करत आहे.
2023-24 या आर्थिक वर्षात भुसावळ विभागातील गती शक्ती युनिटच्यावतीने पायाभूत सुविधा , अमृत भारत स्टेशनचे कार्य सुरू असून यांमध्ये पुढील कामाचा समावेश आहे .
1) भुसावळ डाउन गुड्स यार्ड मध्ये लाँग हॉल लूप लाइन (1800 मीटर) चे कार्य इलेक्ट्रिक लॉकिंगसह पूर्ण करण्यात आले.
2) नवीन इंटरमीडिएट ब्लॉक स्टेशन (IBH) मनमाड ते समिट आणि लाहवीत ते देवळाली विभागातील अप आणि डाऊन मार्गांदरम्यान लाइन क्षमता वाढवण्यासाठी आणि विभागातील गाड्यांची गतिशीलता सुधारण्यासाठी कार्यान्वित करण्यात आली.
हे एक महत्त्वाचे वाहतूक सुविधेचे काम असून त्यामध्ये इगतपुरी-मनमाड विभागाच्या मार्गाची क्षमता वाढवण्यात आली आहे.
3) मूर्तिजापूर स्थानकावर लांब पल्ल्याच्या लूप लाईनच्या तरतुदीचे काम पूर्ण झाले.
4) विभागातील बोरगाव स्थानकावर गुड्स शेड सुविधांसाठी यार्ड रिमॉडेलिंगचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. हे काम पूर्ण झाल्याने मालवाहतूक रेक एकाच ठिकाणी हाताळणे सुलभ होईल.
5) विभागातील वरणगाव ते बोदवड आणि बिस्वा ब्रिज ते नांदुरा दरम्यान स्वयंचलित सिग्नल यंत्रणा यशस्वीरित्या सुरू करण्यात आली. स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली म्हणजे वाहतुकीच्या घनतेनुसार अंदाजे प्रत्येक 1 किमी किंवा 400 मीटर अंतरावर सिग्नल ठेवणे, जेणेकरून अधिक गाड्या धावू शकतील. ट्रेनने सिग्नल पास केल्यानंतर, ट्रेन पुढच्या स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी दुसरी ट्रेन रवाना केली जाऊ शकते. सिस्टीममधील सिग्नल्सची संख्या वाढल्याने आणखी गाड्या पाठवल्या जातील. स्थानकांदरम्यान, विभागांमध्ये प्रत्येक 1 किमी अंतरावर सिग्नल बसवले आहेत. अशा प्रकारे प्रत्येक 1 किमी अंतरावर सेक्शनमध्ये 1 ट्रेन धावू शकते. यामुळे गाड्यांचा वेग वाढेल आणि गाड्यांचा खोळंबा कमी होईल आणि त्यात जास्त गाड्या चालवता येतील.
6) विभागातील एकूण 15 अमृत भारत स्थानकांचे काम वेगाने पूर्ण होत आहे.
ही सर्व नवीन पायाभूत सुविधांची कामे विक्रमी वेळेत पूर्ण केल्याने भुसावळ विभागाच्या कामाचा वेग आणि ट्रेनची गतिशीलता आणि ऑपरेशनमध्ये सतत सुधारणा करण्यासाठीची बांधिलकी दिसून येत आहे .



