भुसावळ मध्ये तापमानाबाबत उच्चांक गाठत असताना पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक व्यवस्था बस स्थानक परिसरात नसल्याने येथील व्यापारी मित्र मंडळ तर्फे नुकतेच सुसज्ज मोफत थंडगार जलसेवेचे उद्घाटन व्यापारी मित्र मंडळाचे प्रमुख राधेश्यामजी लाहोटी व आगार प्रमुख राकेश शिवदे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले .प्रथम आगार प्रमुख राकेश शिवदे व पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे नाना पाटील सर यांच्या हस्ते व्यापारी संघाचे अध्यक्ष राधेश्यामजी लाहोटी व मित्रमंडळाचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले . यावेळी या मोफत जल सेवेचा उपयोग प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन राधेश्यामची लाहोटी यांनी केले . व्यापारी मित्र मंडळातर्फे दरवर्षी बस स्थानक वर पाणपोईची व्यवस्था करण्यात येते .कायमस्वरूपी रीतसर जागा उपलब्ध करून दिली तर कायम Ro युक्त जलसेवा उपलब्ध करून दिली जाईल असे राधेश्यामजी लाहोटी यांनी सांगितले .
यावेळी मोफत जलसेवेचे देखरेख करणारे साहेबराव कोळी यांचे सत्कार करण्यात आला .याप्रसंगी व्यापारी मित्र मंडळाचे नरेंद्र लढा प्रवीण भराडिया राजूभाई पारिख गिरीश मंत्री राजेश लढा संजय चांडक चंद्रकांत मंत्री संजय लाहोटी अशोक काबरा दिलीप टाक रोहित लाहोटी कमलेश झंवर तसेच एसटी महामंडळाचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक नाना पाटील सर तर आभार आभार प्रमुख राकेश शिवदे साहेब यांनी मानले .




