भुसावळ रेल्वे स्थानकावर राडा : दोन गटात जोरदार हाणामारी : आरपीएफ कर्मचाऱ्यावर हल्ला :

भुसावळ – भुसावळ रेल्वे स्थानक क्रमांक 5 वरील जळगाव एण्ड बाजूकडे मद्रास बेकरीच्या नवीन स्टॉलचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित दोन गटामध्ये जोरदार राडा होवून झालेल्या हाणामारीत आरपीएफ कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना मंगळवार २ एप्रिल रोजी घडली यामध्ये आरपीएफ निरीक्षक यांना धक्काबुक्की करीत कर्मचारी यास मारहाण करण्यात आली

भुसावळ येथील राधा किशन मीना वय 42 आर.पी.एफ. निरीक्षक,रेल्वे सुरक्षा बल भुसावल हे त्यांचे शासकीय कर्तव्यावर मुख्य पार्सल कार्यालय भुसावळ येथे हजर असताना त्यांना दिपक तायडे यांनी फोनद्वारे त्यांना माहिती दिली. की, प्लॅटफॉर्म क्र.5 च्या जळगाव एंड बाजूकडे मद्रास बेकरीच्या नवीन स्टॉलचे उद्घाटन झाले असुन त्याठिकाणी उ‌द्घाटनासाठी आलेले लोक व प्लॅटफॉर्म नं.6 वरील एम आर इंटरप्रायजेसचे वेंडर आणि इतर बाहेरचे लोक असे जवळ जवळ 150 लोक जमा झाले. याठिकाणी मद्रास बेकरीच्या नविन स्टॉलच्या कारणावरुन दोन्ही गटांमध्ये आपसात वाद सुरु आहे.त्यानंतर निरीक्षक मीना यांनी सदर घटनेबाबत जी.आर.पी.भुसावळचे प्रभारी अधिकारी स.पो.निरीक्षक मगरे यांना माहीती दिली व तात्काळ स्टाफ पाठविणेबाबत कळविले दरम्यान रेल्वे पोलीस निरीक्षक मीना यांनी प्लॅटफॉर्म नं.6 वर पोहचुन तेथे उपस्थित एम आर इंटरप्राईजचे चे सुपरवायझर अफसर रफीक मेमन, रियाज अब्दुल मोहम्मद रहेमान, शेख कलिमोद्दीन अलीमोद्दीन, शेख नदीम नथ्थु बागवान तसेच *मद्रास बेकरीचे सय्यद हमिद सय्यद कासिम, रईस सद्दाम बागवान (रईस पहेलवान), सय्यद कासिफ सय्यद हमिद, शेख इरफान शेख चाँद तथा दोन्ही गटांचे इतर जवळ जवळ १५० लोकांना आरपीएफ व जीआरपी कर्मचाती यांनी वाद सोडवुन शांत केले. त्यातील मुख्य व्यक्तींना आरपीएफ पोलीस ठाणे भुसावळ स्टेशन येथे घेवुन गेले असता फिर्यादी व त्यांचे सहकारी स्टॉफ प्लॅटफॉर्मवरील बेकादेशिर जमाव नियंत्रित करीत असतांना प्लॅटफॉर्म नं.5/6 वरील खंडवा बाजुच्या ब्रिजजवळ बेकायदेशिर जमावामधील सद्दाम शेख बशीर, आझाद शेख बशीर, शेख सलमान शेख बशीर, मुझफ्फर सय्यद लियाकत अली, शेख समीर शेख हमिद, वसीम खान बिस्मिल्ला खान व इतर आरोपींनी मिळुन फिर्यादी व त्यांचे सहकारी निरीक्षक महेंद्र कुशवाह यांच्यावर अचानक हल्ला केला व फिर्यादी निरीक्षक मीना यांना धक्काबुक्की करुन जखमी केले तसेच फिर्यादीच्या शासकिय गणवेशाची कॉलर खेचली त्यामध्ये फिर्यादीच्या शासकीय गणवेशाच्या शर्टचे बटण तुटले तसेच फिर्यादीचे सहकारी आरक्षक महेंद्र कुशवाह यांना हाताने व लाथाने मारहाण करुन व चेह-यावर मारुन गंभीर जखमी केले आहे. त्यावेळी त्याठिकाणी हजर असलेल्या इंतर स्टाफ मधील आरक्षक जे. पी. मिना व सपोनि दिपक तायडे व इतर एमएसएफ स्टाफने फिर्यादी व जखमी यांची जमावाच्या तावडीतुन सुटका केली त्यावरून फिर्यादी यांनी जी.आर.पी. पोलीस ठाणे भुसावळ येथे दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .