भुसावळात मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे ७ एप्रिल रोजी निडणूक प्रशिक्षण :

    

भुसावळ – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील मतदान केंद्रासाठी नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण पांडुरंग टॉकीज भुसावळ व प्रत्यक्ष ( EVM ) ईव्हीएम हाताळणी प्रशिक्षण म्यूनिसिपल हायस्कूल जामनेर रोड भुसावळ येथे ०७/०४/२०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षणासाठी १२९६ कर्मचाऱ्यांना नियुक्त पत्र दिले आहे. यामध्ये
(१) प्रथम सत्र सकाळी ९ ते ११:०० व प्रत्यक्ष EVM हाताळणी सकाळी ११:०० ते दुपारी १.००
(२) द्वितीय सत्र दुपारी १२.०० ते ०२.०० व प्रत्यक्ष EVM हाताळणी प्रशिक्षण दुपारी ०२.०० ते ०४.०० याप्रमाणे प्रशिक्षण होणार आहे .