भुसावळ तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी डी.आर. धांडे तर सचिव पदी व्ही एस पाटील कार्याध्यक्ष मनोज वारके यांची यांची बिनविरोध निवड :

वरणगाव – भुसावळ तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या संघाची बिन विरोध निवड करण्यात आली. सदर निवड निरिक्षक राजू कुलकर्णी, व प्रा. अशोक निकम डॉ. प्रदिप साखरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रथम क्रीडा महासंघाच्या माध्यमातून क्रीडा शिक्षकांच्या सोडवलेले प्रश्न विषयी व केलेल्या कामाची माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप साखरे यांनी दिले नंतर कार्य करण्याची निवड करण्यात आली. त्यात भुसावळ तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी डी. आर. धांडे. (ज्ञान ज्योती विद्यालय खडके.) कार्याध्यक्षपदी प्रा.मनोज वारके( पु.ओ. नाहटा कॉलेज भुसावळ) उपाध्यक्षपदी अपर्णा राजपूत .माध्यमिक विद्यालय ओझरखेडे , आनंद पाठक( डि‌. एल.हिंदी विद्यालय), आर.डी. तायडे .(ऑर्डर फॅक्टरी विद्यालय वरणगाव.) सय्यद अझहर अली युनुस आली. (बि.झेड. उर्दू हायस्कूल भुसावळ ) सचिव पदी व्ही. एस. पाटील (श्रीकृष्ण हायस्कूल शिंदी) सहसचिव पदी सुनील चौधरी (महात्मा गांधी विद्यालय वरणगाव.) व्ही.सी. पाचपांडे‌. (नेहरू विद्यालय तळवेल,) वंदना ठोके (अहिल्यादेवी कन्या विद्यालय भुसावळ,) कोषाध्यक्षपदी ईश्वरदास खंडेलवाल (कोटेच्या विद्यालय भुसावळ.) संघटक प्रमुख एल. व्ही. नेमाडे. (महात्मा गांधी विद्यालय वरणगाव.) एम. एम.चौधरी. (सर्वोदय हायस्कूल किन्ही, ) प्रसिद्धीप्रमुख प्रमुख गोपाल जोनवाल. अनिल डी. महाजन अरुणोदय विद्यालय बोहार्डी . यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.सदस्यपदी व्ही. एस. वाणी, एन.पी. नेहते , विनय काळे, के आर कुलकर्णी, वाय. व्ही. खिरडीकर ,दिलीप सुरवाडे, के. आर. पाटील. सौ. एम.एम.जोशी, गौतम वानखेडे, हिम्मत पाटील. तसेच सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक हे सदस्य म्हणून राहतील तर मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शक ए .आर. गुरचड, हे काम बघतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील यांनी केले. आभार वंदना ठोके यांनी मानले.