मध्य रेल्वे प्रवासी वाहतुकीमध्ये सर्व विभागीय रेल्वेंमध्ये आघाडीवर – आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १५८३ दशलक्ष प्रवासी वाढ

मध्य रेल्वेने भारतीय रेल्वेवर सर्वाधिक प्रवाशांची वाहतूक केली आहे, गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील १४६५ दशलक्ष प्रवाशांच्या तुलनेत २०२३-२४ (एप्रिल-२०२३ ते मार्च-२०२४) या आर्थिक वर्षात १५८३ दशलक्ष प्रवासी उल्लेखनीय आहेत. अशाप्रकारे तब्बल ८% ची वाढ नोंदवत, सर्व विभागीय रेल्वेंमध्ये प्रथम स्थानावर आहे.

प्रवासी महसूल उत्पन्न आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी रु. ७३११ कोटी होती, जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील ६४१४ कोटींच्या तुलनेत १४% नी वाढली आहे.

मध्य रेल्वे आपल्या सर्व प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम प्रवास देण्यासाठी तत्पर आहे.