आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य उत्सव साजरा : संताजी महिला मंच बोदवड यांचे कौतुकास्पद कार्य :

बोदवड – ती स्वमिनी .. ती रणरागिणी..भासे कधी ती लख्ख चांदणी..असो उंच वा काठ किनारी करतसे प्रीतीची ती अचूक सांधणी . कर्तव्य पूर्तीला सज्ज शोभते दशभूजा ती महिलादिनी..गजविते विश्व ती करून बांधणी शोभे साजरी ती संताजीची हिरकणी…
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आरोग्य उत्सव. बोदवड येथे संताजी महिला मंच बोदवड यांच्यातर्फे शनिवार दिनांक 9/ 03/2024 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली . महिलांची बोन मिनरल डेंसिटी तपासण्यात व त्याचा रिपोर्ट देण्यात आला. तसेच महिलांची हिमोग्लोबीन तपासणीही करण्यात आली. यासोबतच बोदवड केमिस्ट असोसिएशन तर्फे महिलांना कॅल्शियमच्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात कमतरता आले. अंदाजे 1800/- रू प्रत्येकी पर्यंत खर्चाची BMD TEST. डॉ वृषाली चौधरी यांच्या चौधरी IVF सेंटर -केळकर हॉस्पिटल, भुसावळ यांच्या सौजन्याने आणि HB तपासणी संजय भालेराव यांच्या संजीवनी पथलॉजी बोदवड पूर्णपणे मोफत देण्यात आली त्याचा समाजातील 160 हुन अधिक महिलांनी लाभ घेतला.

या कार्यक्रमात बोदवड तालुक्यातील गुणवंत मुलींचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला .या मुली पुढील प्रमाणे गायत्री तेली, भुमिका चौधरी, सोमेश फाटे, सृष्टी तेली, अक्षदा चौधरी, यज्ञा चौधरी, भाग्यश्री डवले, ऋतुजा खेवलकर , काजल तुरे, सिद्धांत चौधरी आहेत .तसेच “नारीशक्ती संवर्धन “कार्यक्रमात सिंधुताई सपकाळच्या भूमिकेत यज्ञा चौधरी, अहिल्याबाई होळकर च्या भूमिकेत अक्षदा चौधरी, जिजामाता भूमिकेत ओवी चौधरी,राणी ताराबाईच्या भूमिकेत अभिष्टा चौधरी, झाशीची राणी समृद्धी चौधरी सावित्रीबाई फुले अनुष्का चौधरी इत्यादी मुलींनी नारी शक्तीचे दर्शन घडविले. तसेच दिपाली फाटे यांनी कवितावाचनातून आणि गुनिका खेवलकर यांनी शब्दसुमनातून महिलांविषयी भावना व्यक्त केल्या.ममता चौधरी यांनी सासू म्हणजे आई याविषयी आपले मनोगत व्यक्त करुन विवाहा आधीही व त्यानंतरही मी एकत्र कुटुंबात आहे याचा मला खूप मोठा अभिमान आहे.माझी सासू म्हणजे कै.लीलाबाई मधुकर चौधरी यांच्या रूपात आईच मिळाली होती. डॉ. वृषाली चौधरी यांनी महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना आरोग्य विषयी मार्गदर्शन केले .आपण काम करताना स्वतःच्या आरोग्य दुर्लक्ष करतो व शेवटच्या वेळेला आपल्याला समजते यासाठी आपण आधीपासूनच काळजी घेतली पाहिजे याच्या टिप्स त्यांनी सांगितल्या. तसेच स्वामी समर्थ केंद्र तर्फे रेश्मा चौधरी व कोल्हे मॅडम यांनी आपला आहार विहार कसा असावा याविषयी प्रदर्शन मांडले होते व महिलांना समजून सांगितले .ख़ुशी अजय फाटे आणि पूनम चौधरी यांनी महिलादिनाला सुचक रांगोळी काढली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रीती चौधरी व सौ लीना तेली यांनी केले. तर आभार पूनम चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टेजवर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका योगिता खेवलकर, अश्विनी चौधरी कमलबाई तेली जामठी येथील मनीषा चौधरी व अध्यक्ष म्हणून डॉ वृषाली चौधरी या उपस्थित होत्या .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव ललिता चौधरी तसेच सविता चौधरी, गीता तेली पूनम चौधरी, आणि सर्व महिला मंच सदस्यांनी खूप परिश्रम घेतले.