राहुल गांधीच्या भारतजोडो न्याय यात्रेचे नंदुरबार येथे १२ मार्चला होणार आगमन : जिल्हा कॉग्रेस कमेटीची महत्वपूर्ण बैठक संपन्न :


जळगाव – काँग्रेस नेते राहुल गांधीच्या भारतजोडो न्याय यात्रेचे नंदुरबार येथे १२ मार्चला आगमन होणार असून या यात्रेत सहभागी होण्यासाठी व स्वागता करीता रूपरेषा ठरविण्याकरीत जळगाव येथे जिल्हा कॉग्रेस कमेटी ची महत्वपूर्ण बैठक कॉग्रेंस भवन येथे संपन्न झाली . बैठक जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार यांचे उपस्थितीत संपन्न झाली या यात्रा मध्ये जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे बैठकीस सर्वे प्रदेश पदाधिकारी ,तालुका व शहर अध्यक्ष सर्व सेल चे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात सर्व प्रथम भुसावळ चे समनवयक विजय मगळे यांनी यात्रा नंदुरबार ते धुळे, मालेगांव नाशिक प्रर्यत जाणार असून याबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी
प्रमुख आमदार शिरीष चौधरी , माजी आमदार निळकंठ फालक,माजी जिल्हा अध्यक्ष ऐड संदीप पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्यक विभाग मो मुनव्वर खान, प्रदेश सचिव अँड सलीम पटेल,महीला अध्यक्ष सुलोचना वाघ ,प्रतीभा मोरे , डॉ ईश्वरीया राठोर जिल्हा अल्पसंख्यक हमीद शेख, शहर अध्यक्ष रविन्द्र निकंम संतोष सालवे,,सरचीटनीस ज्ञानेश्वर कोळी सोमवंशी जिल्हा अध्यक्ष अशपाक पटेल,कदीर खान व सर्वे तालुका शहर अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले व या बैठकीत जिल्ह्यामधील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . सुत्रसंचलन जिल्हा सरचीटनीस जमील शेख यानी केले .