भुसावळचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांचा भुसावळ कॉग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागातर्फे सत्कार :

भुसावळ- येथील डॅशिंग व कर्त्तव्यदक्ष पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांच्या सतर्कतेमुळे एका मुलाचे प्राण वाचले याकरिता येथील महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागातर्फे तालुक्याचे सिंघम डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले .

जामनेर रोडवर शुक्रवारी एका मुलावर काही जमाव प्राणघात हल्ला करत होते त्यावेडी डीवायएसपी तेथून जात होते त्या घटना पाहुन धावत्या गाडी मधुन ऊडी घेउन त्यांनी तरुणाचे प्राण वाचविले त्यांच्या कार्यास सलाम असे कौतुक करून कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मो मुनव्वर खान यांनी करून त्यांचे कार्यालयात आज सत्कार केला . यावेळी ,शहर अल्पसंख्यकचे अध्यक्ष सलीम गवळी सेवादलाचे अध्यक्ष संजय खडसे, जिल्हा सचिव हमीद शेख उपस्थित होते . पिंगळे यांना राष्ट्रपति अवार्ड देण्यात यावा अशी मागणीही मो मुनव्वर खान यानी यावेळी केली