संभाजीनगर येथून पायी चारीधाम यात्रेस निघालेल्या युवकाचे भुसावळात गोसेवकांनी केले स्वागत :

भुसावळ – आपल्या हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी संभाजीनगर येथून चारधाम यात्रेस निघालेला युवक आज सोमवार 12 रोजी भुसावळ शहरात दाखल होताच येथील गोसेवाक परिवारातर्फे त्याचे जंगी स्वागत करण्यात येऊन पुढील प्रवासाकरीता शुभेच्छा दिल्या आहेत .

छत्रपती संभाजी महाराज नगर मधुन दिनांक 4/2/24 ला यात्रेस निघालेले मनोज (शिवाभाऊ) शिंदे हे ओंकारेश्वर , उज्जैन , मथुरा , हरिद्वार , केदारनाथ , बद्रीनाथ , अयोध्या, यासह काशी काशीला निघाले आहेत त्यांचा प्रवास पाच महिन्यांचा असून आयुष्यातील सर्वात मोठी पायदळ वारी करण्याचा शिंदे यांचा संकल्प आहे . आयुष्यात एकदातरी चारधाम यात्रा पायी करावी असे आवाहन शिंदेनी यावेळी केले केले . प्रसंगी शिंदे यांच्या भोजनाची व्यवस्था करून त्यांना निरोप देऊन गोसेवक व गोप्रेमी यांनी निरोप दिला .यावेळी
गोसेवक व गोप्रेमी तुषार फालक , तुषार ठाकुर , रोहित महाले , जयेश चौधरी अनिल टोंगे आप्पा ठाकरे रोहित तुषार नेहते , भंगाळे , भावेश फालक आदी उपस्थित होते .