भुसावळ – महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग च्या वतीनेअल्पसंख्याक मुस्लिम विकास योजना अंतर्गत अल्पसंख्यॉक बस्ती मध्ये रोड नाली संडास तुटलेले पुल बनवणे बाबत भुसावळ उपविभागीय अधिकारी पाटील यांना आज 12 रोजी निवेदन देण्यात आले .सदर निवेदन प्रत जिल्हाधिकारी व भुसावळ पालिका मुख्याधिकारी यांनाही रवाना केल्या आहेत .
निवेदनात नमूद आहे की , महाराष्ट्र सरकारने यावर्षी अल्पसंख्यॉक मुस्लिम विकास योजना अंतर्गत 700 करोड रुपयाचे बजेट मुस्लिम समाजचे बस्तीचे विकास कामा साठी मंजूर केले आहे या साठी मागणी आहे की मागील 25वर्षा पासुन मुस्लिम अल्पसंख्यॉक बस्ती मध्ये रोड नाली तुटले पुल बनवण्यात आलेले नाही नसरवांजी फाईल जाम मोहल्ला आर के किताब घर ते डी एल हिन्दी हाईस्कूल,खडका रोड,गौसीया नगरचे रोड फारच खराब झाले आहे तेथून पायी चालणे कठीन झाले आहे,या भागातील नसरवांजी फाईल, मिल्लत नगर , आगआख वाडा,भागाचे पुलाची दोन्ही बाजुची भिंत तुटलेली आहे यामुळे कधीही जिवीतहानि होण्याची संभावना नाकारता येत नाही या सर्व बाबीचा विचार करुन सुरक्षा भिंती त्वरित दुरुस्त करण्यात यावी
याबाबत वारंवार निवेदन देऊन सुद्दा काही परीणाम झाले नाही या सर्व बाबीचा गंभीर्याने विचार करुन सरकार ने अल्पसंख्यॉक मुस्लिम विकास योजना अंतर्गत जो फंड मंजूर केला आहे त्या फंडा व्दारा मुस्लिम बस्तीचे कार्य त्वरित शुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे . निवेदन देते समयी प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी मो मुनव्वर खान प्रदेश , शहर अल्पसंख्यांक सलीम गवळी , जिल्हा सचिव कॉग्रेंस अल्पसंख्यक विभाग
हमीद शेख , सेवादल शहर अध्यक्ष
संजय खडसे ,सागर वानखेड़े
जगपाल सिंग ,बाग सिंग,
जानी गवळी ,शैलेश अहीरे आदिं उपस्थित होते .



