भुसावळ – येथे बुधवार दिनांक १४ रोजी वसंत पंचमी निमित्त वसंतोत्सव या कथक नृत्याचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी सात वाजता पुरुषोत्तम नगर येथील गायत्री मंदिरात हा कार्यक्रम संपन्न होईल. यात नुपूर कथक डान्स अँकॅडमी च्या विद्यार्थ्यांसोबत नृत्य शिक्षिका चारू भालेराव नृत्य सादर करतील . तरी सर्व रसिक नागरिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


