भुसावळात हिरकणी महिला मंच , सक्षम कौन्सिलींग सेंटर , सक्षम नारी फाउंडेशन यांचा स्तुत्य उपक्रम : शरीर आणि मन या दोघांना सजविणारा आणि मैत्रीणींना मानसिक आरोग्याचे वाण देणारा आगळा वेगळा हळदी-कुंकु कार्यक्रम संपन्न :


भुसावळ – येथील हिरकणी महिला मंच , सक्षम कौन्सिलींग सेंटर , सक्षम नारी फाउंडेन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 10 रोजी – पंचायत समीती हॉल, येथे . आयोजित करण्यात आला होता, आणि या हळदी कुंकवास परिसरातील 200 मैत्रिणींनी। उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला…
या कार्यक्रमास अर्चना फेगडे यांची प्रमुख उपस्थिती होती,

“जानेवारी महिना म्हणजे संक्रांतीचा सण !
आणि त्यात हळदी कुंकवाचे वाण”..!!
हे समीकरण अगदी पक्के आहे.
आणि धकाधकीच्या जीवनात या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात, प्रथम आर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉ,वंदना वाघाचौरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली,त्यात आपण मैत्रिणी आपल्या शारीरिक आरोग्यासाठी जागरूक असतो मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो , म्हणूनच आम्ही मैत्रिणींच्या मनाचे वेध घेण्यासाठी हा या आगळ्यावेगळ्या हळदीकुंकू कार्यक्रमाच्या आयोजन करण्याचे ठरविले होते
या वेळी अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रथम शिवरायांच्या पोवाड्यावर सुंदर नृत्य करून कार्यक्रमाची सुरुवात केली ,
तद्नंतर नारी फाउंडेशनच्या सर्व मैत्रिणींनी “डिप्रेशन” या विषयावर अतिशय छान नाटिका सादर करत डिप्रेशन या विषयावर एक लग्नात टीका सादर करून सर्वांच्या मनात मानसिक आरोग्य विषयी दुर्लक्ष करू नये असे अनेक प्रश्न निर्माण करत नाटिकेचा शेवट करण्यात आला
जळगाव येथील प्रमुख मार्गदर्शक
डॉ. कांचन नारखेडे
यांनी महिलांच्या मानसिक समस्या कोणत्या? आणि त्यावरील उपाय काय करावे, याविषयी महिलांना सविस्तर विश्लेषण केले, तसेच सक्षम कौन्सिलींग सेंटर, च्या
सौ आरती चौधरी यांनी सर्व उपस्थित सर्व मैत्रिणींना आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या छोट्या छोट्या मानसिक समस्या विषयी सविस्तर सांगून त्या कशा पद्धतीने हाताळाव्या या विषयक मार्गदर्शन केले
यांनातर घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धा (फॅन्सी ड्रेस) स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये
प्रथम बक्षीस कोमल तायडे द्वितीय बक्षीस भावना झा
यांनी पटकावले,
तसेच उखाणा स्पर्धा(विषय – मानसिक आरोग्य)
प्रथम.. सौ. प्रभा पाटील
द्वितीय.. शितल मोरे
यांना पारितोषिक मिळाले लकी ड्रॉ लकी ड्रॉ आणि
अर्चना फेगडे , वंदना सोनवणे , राजश्री सोनवणे दिपाली पाटील यांना मिळाले , तर वैशाली चौधरी या मैत्रिणीने बंपर लकी ड्रॉ पैठणी पटकावली
तसेच बरेच मनोरंजनात्म कार्यक्रम आणि फुल धम्माल मस्ती
करून अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने डॉक्टर सुवर्णा गाडेकर यांनी सूत्रसंचालन करून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सर्व मैत्रिणींना कार्यक्रमा दरम्यान खिळवून ठेवले
या आगळ्यावेगळ्या हळदीकुंकवासाठी हिरकणी महिला मंचच्या संपूर्ण सदस्य अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजची संपूर्ण टीम , सक्षम नारी फाउंडेशनची संपूर्ण टीम
सक्षम कौन्सिलिंग सेंटरच्या संपूर्ण मैत्रिणींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले