भुसावळ-येथील भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटना कार्यरत असून संघटनेच्या ध्येय धोरणानुसार महाविद्यालयातील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासासाठी चर्चासत्र,कार्यशाळा,सेमिनार,शिबिर, गटचर्चा,इ.कार्यक्रम राबविले जातात शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून माजी विद्यार्थी संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार महाविद्यालयातील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने महाविद्यालयात “स्व.नानासाहेब देविदास गोविंद फालक(डीजीपी) रोजगार कक्षाची” स्थापना नुकतीच करण्यात आली कक्षामार्फत परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार निर्माण व्हावा यासाठी या कक्षाची स्थापना केली असून कक्षा मार्फत राज्यातील आणि इतर राज्यातील वेगवेगळ्या कंपन्यांशी संपर्क साधून रोजगार शिबिर आयोजित केले जाणार असून या कक्षा मार्फतच मुलाखत तंत्र,असे कार्यक्रम देखील राबविले जाणार आहेत भुसावळ परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांनी कक्षाशी संपर्क साधून समन्वयक प्रा.प्रशांत पाटील मो.नं.9822787933,सहसमन्वयक डॉ.चंद्रकांत सरोदे मो.नं.9665049895 यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन माजी विद्यार्थी संघटनेतर्फे करण्यात येत आहे कक्षाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस व्ही पाटील,उपप्राचार्य डॉ.बी एच बऱ्हाटे डॉ.ए डी गोस्वामी कार्यालयीन अधीक्षक श्री भगवान तायडे,श्री. सचिन पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन लाभत आहे



