भुसावळ –

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाची जिल्हा कार्यकारणी नुतन जिल्हाध्यक्ष नागेश्वर सावळे यांनी जाहीर केली आहे.
सदरील कार्यकारणीत सात उपाध्यक्ष,दोन सरचिटणीस तसेच सात चिटणीस असुन कार्यकारणीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा संघटनात्मक समतोल साधल्याचे दिसुन येत आहे.
यात सरचिटणीस पदी फेकरीचे प्रशांत निकम,अर्जुन वाघ यांची वर्णी लागली आहे तर उपाध्यक्ष म्हणून सुरेंद्र पालवे,दिलीप कडू सुरवाडे, दिलीप लाहसे, किरण वसंत सोनवणे, कमलेश मोतीराळे, कैलास भीवा सुरवाडे, संतोष झनके चिटणीस पदी सिद्धार्थ तुकाराम तायडे, नगिन वाघ,विशाल राजू गव्हाळे, बबलू घारू ,संतोष मेढे, मिलिंद भैसे, प्रल्हाद केदारे, कोषाध्यक्षपदी दीपक सुखा पाटील, सोशल मीडिया प्रमुख पदी विनोद वाघोदे तसेच दीपक तायडे, ज्ञानेश्वर चांदणे, अनिल डांबरे, प्रेम कुमार घोगरे, बाळू काकडे, नगीनदास सवर्ने, जितेंद्र वानखेडे यांची अनुसूचित जाती मोर्चा कार्यकारणी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.
तर कायम नियंत्रित सदस्य पदी लक्ष्मण सोयंके, जयपाल बोदडे, विलास भालेराव, सविता भालेराव, राजेश साळुंखे, विकास अवसरमल, लताताई बाविस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, डॉ राजेंद्र फडके, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन ,अशोक कांडेलकर, अजय भोळे, हर्षल पाटील, हिराभाऊ चौधरी जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, परीक्षीत बऱ्हाटे, आतिश झालटे, हरलाल कोळी, वैशाली कुलकर्णी यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


