भुसावळ- येथील कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय ,भुसावळ येथे “प्रकल्प अहवाल कसा तयार करायचा” या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक ०५फेब्रुवारी २०२४ रोजी हायब्रीड पद्धतीने घेण्यात आले. कार्यक्रमाच्या उदघाटनाला ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ .मोहन फालक, चेअरमन .महेश फालक, (डायरेक्टर)गोदावरी इन्सिट्यूट ऑफ मानजमेंट अँड रिसर्च, प्रा डॉ .प्रशांत वारके,प्राचार्य डॉ .एस .व्ही .पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच. बऱ्हाटे,उपप्राचार्य डॉ. ए. डी .गोस्वामी , वाणिज्य व व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ.ममताबेन पाटील, कार्यशाळा संयोजक व व्यवस्थापन अभ्यासक्रम समन्वयक प्रा.स्मिता एन .बेंडाळे , कार्यशाळा समन्वयक प्रा. सपना जंगले आदी व्यसपीठावर उपस्थित होते. प्रा डॉ .प्रशांत वारके सर यांनी विदयार्थी , संशोधन अभ्यासक,संशोधन मार्गदर्शक,प्राध्यापक यांना संशोधन प्रकल्प अहवाल या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी संशोधनाची उद्दिष्टे , व्याप्ती, गृहितके , संशोधन पद्धती आणि गृहीतके चाचणीबद्दल माहिती दिली . वक्त्यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन संशोधनाची व्याप्ती समजावून सांगितली .सर्व सहभागींनी भरपूर प्रतिसाद दिला.
या कार्यशाळेसाठी भारतातील प्रत्येक राज्यातून सुमारे ८०० सहभागींनी नोंदणी करून कार्यशाळा यशस्वी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी .वाय.बीबीएची विद्यार्थिनी अर्वा भारमल हिने केले. पाहुण्यांचा परिचय एफ. वाय. बीबीएचा विद्यार्थी लिअम यंग याने केले.

आभार प्रदर्शन कार्यशाळा समन्वयक प्रा.सपना जंगले यांनी केले.सदर कार्यशाळेला संगणक विभागातील प्रा.हर्षल पाटील यांचे तसेच प्रा.खिलेश पाटील यांचे तांत्रिक साहाय्य प्राप्त झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. के .पी.पाटील ,डॉ.रश्मी शर्मा ,प्रा.स्वाती शेळके, प्रा.जयश्री चौधरी, प्रा.एकता बजाज, प्रा.ललिता पाटील त्यांचे योगदान लाभले.


