चाळीसगाव – चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माजी माजी नगरसेवकावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून जखमी केल्याची खळबळजनक घटना बुधवार ७ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले आहे.

यासंदर्भात मिळालेले माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावरती गोळीबार करून जीवघेणा हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडला आहे. या गोळीबारमध्ये माजी नगरसवेक बाळू मोरे थोडक्यात बचावले असून त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे ही घटना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. हा गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समोर आलेले आहे. याचे गंभीर दखल घेत चाळीसगाव पोलीसांनी कसुन चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.


