भुसावळ –

तालुक्यातील हतनूर धरणावरील तिसऱ्या देवगिरी शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट डॉक्युमेंटरी कॅटेगिरीत अरविंद गजानन जोशी दिग्दर्शित आणि चातक नेचर कंझर्वेशन सोसायटी, वरणगाव तथा जिल्हाधिकारी, जळगाव निर्मित ‘हतनूरचे वारकरी’ या डॉक्युमेंटरी फिल्मला ‘सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फिल्म’ हा किताब प्राप्त झाला आहे.
चांगदेव – हतनूर – मेहूण तसेच मुक्ताई-भवानी व्याघ्र संरक्षित क्षेत्र यासह परिसराला धार्मिक-सांस्कृतिक महत्व आहेच, सोबतच जैवविविधतेच्या दृष्टीनेही हा परिसर समृद्ध आहे. या हतनूर धरण परिसरात दरवर्षी देशविदेशातील हजारो पक्षी स्थलांतर करून येतात या समृद्धीची माहिती सगळीकडे व्हावी म्हणून इंग्रजी तसेच मराठी या दोन्ही भाषांमध्ये ही डॉक्युमेंटरी फिल्म तयार केली आहे. १५ मिनिटांची ही फिल्म आहे जळगाव येथे पार पडलेल्या देवगीरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये चातक नेचर कंझर्वेशन सोसायटीचे पक्षीशास्त्रज्ञ अनिल महाजन यांच्या सकल्पनेतून साकारल्या गेलेल्या हतनूरचे वारकरी या माहितीपटास सर्वोत्कृष्ट बहुमान मिळाला
महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षीशास्त्रज्ञ व चातक नेचर सोसायटीचे अध्यक्ष अनिल महाजन यांच्या सकल्पनेतून जळगाव येथे देवगीरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये हतनूरचे वारकरी या माहितीपटाची हतनूर ' मेहुण , मुक्ताई -भवानी व्याघ्र संरक्षीत क्षेत्र आपण राहतो त्या परिसराला धार्मीक , संस्कृतीक महत्व आहे त्याच बरोबर संत , मंहताची भुमी असून सोबत जैव विविधतेने समृद्ध आहे हतनूर धरण व पाणलोट क्षेत्रामध्ये दर वर्षी देश विदेशातून हजारो पक्षी स्तलांतर करून तीन ते चार महिण्याच्या मुक्कामास थांबतात या समृद्धीची माहिती व्हावी यासाठी इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषेत या महातीपटचे सादरी करण्यात आले होते वारकरी संप्रदायाच्या ऐतिहासिक जडण घडणीतील अंतर्गत वैचारिकअभिसरणा असलेल्या या माहितीपटास उत्कृष्ट किताब मिळाला
या माहितीपटाचे निर्दर्शक अरविंद गजानन जोशी , सह दिग्दर्शक सौरव महाजन , कार्यकारी निर्माता समीर नेवे यांनी काम केले आहे तर तातकालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विशेष सहकार्य केले
दि २७ व र २८ जानेवारी रोजी कवित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत खाशबा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या देवगीरी शार्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये “हतनुरचे वारकरीच्या निर्मात्याना मानचिन्ह प्रशिस्त पत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी समारोहात फिल्मचे सहाय्यक दिग्दर्शक सौरभ महाजन आणि कार्यकारी निर्माता समीर नेवे यांनी किताब स्वीकारला.


