वरणगावला मराठा आरक्षण घोषणे नंतर बस स्थानक चौकात जल्लोष

वरणगाव – मराठा आरक्षणावर गेली कित्येक महिन्या पासून सुरू असलेला मनोज जरांगे (पाटील ) यांनी केलेल्या वेळोवेळी अदोलनाचा संघर्ष संपूर्ण आरक्षणाची घोषणा शासनाच्या वतीने याची घोषणा केल्याने शहरातील व परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने बस स्थानक चौकात जल्लोष करीत फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली

मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरागे (पाटील ) यांचे मराठा आरक्षणासाठी गेल्या कित्येक दिवसा पासून सुरू असलेले आंदोलन ताफा मुंबई येथे पोहचल्या नंतर सरकारने त्यांच्या मागणी मान्य करीत उपोषण सोडविल्या नंतर शहरातील बस स्थानक चौकात एकच जल्लोष करीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात जरागे पाटीलांनी संघर्ष करीत समाजासाठी केलेल्या आंदोलनामुळे आरक्षण मिळवून दिल्याने आभार व्यक्त केले
यावेळी शहर व परिसरातील सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते